मुख्य बातम्या

शिरूर तालुक्यात सामाईक विहिरीच्या पाण्यावरून वाद पेटला; दगड अन् कुऱ्हाडीने मारहाण…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात सामाईक विहिरीवरील पाण्याची मोटार बंद केल्याचा जाब विचारणे आणि यापुर्वी पोलिसांत तक्रार दिल्याचा राग… या दोन कारणांवरुन शिंदेवाडी येथे दोन गटांमध्ये वाद उफाळून आल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण केल्याचे गंभीर आरोप करत दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात फिर्यादी दाखल केल्या आहेत. दि २७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी आठच्या दरम्यान घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

पाण्याच्या मोटारीचा जाब विचारला अन् वाद चिघळला…
सविता दशरथ कोळपे (वय ४०, रा. शिंदेवाडी, ता. शिरुर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सामाईक विहिरीवरील पाण्याची मोटार बंद केल्याबाबत विचारणा करण्यासाठी त्या आरोपींच्या घराजवळ गेल्या होत्या. यावेळी वैशाली भिवा शिंदे, भानुदास भिवा शिंदे आणि भिवा ठकाजी शिंदे यांनी शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप त्यांनी फिर्यादित केला आहे.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, वैशाली शिंदे हिने त्यांना खाली पाडले, तर भानुदास शिंदे याने दगडाने हाताला, डोक्याला व पाठीवर मारहाण करुन दुखापत केली. भिवा शिंदे यानेही लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सहायक फौजदार चव्हाण करीत आहेत.

जुन्या तक्रारीचा राग; कुऱ्हाडीच्या उलट्या बाजूने मारल्याचा आरोप…
दुसऱ्या बाजूने भिवा ठकाराम शिंदे (वय ४२, रा. शिंदेवाडी, मलठण, ता. शिरुर) यांनी दशरथ तुकाराम कोळपे आणि सविता दशरथ कोळपे यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. फिर्यादी घरासमोरील मोकळ्या जागेत दात घासत उभे असताना दोन्ही आरोपी तेथे आले. त्यांच्या मुलाने यापूर्वी टाकळी हाजी पोलीस चौकीत तक्रार का दिली, या कारणावरुन वाद झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या वादात दशरथ कोळपे याने हातातील लोखंडी कुऱ्हाडीच्या उलट्या बाजूने डोक्यावर मारुन जखमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

भांडण सोडविण्यासाठी मध्ये आलेल्या फिर्यादींच्या पत्नी वैशाली शिंदे यांना सविता कोळपे हिने हाताने मारहाण केली, तसेच दोघांनी शिवीगाळ व दमदाटी केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार वायाळ करीत आहेत. एका बाजूने सामाईक विहिरीवरील पाण्याच्या मोटारीचा वाद, तर दुसऱ्या बाजूने पूर्वी पोलिसांत तक्रार दिल्याचा मुद्दा समोर आला आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर मारहाण आणि दमदाटीचे आरोप केल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र फोडून ५२० किलो तांब्याच्या तारांची चोरी…

शिरूर पोलिसांची अवैध दारु विक्रीवर कारवाई; दोन ठिकाणी छापा टाकत मुद्देमाल जप्त…

सिस-पे आर्थिक फसवणूक प्रकरणात शिरूरच्या तलाठ्याला अटक; २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर तालुक्यातील दोन हवालदारांवर एसीबीची कारवाई; एकाने घेतली लाच तर दुसरा झाला पसार…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; रस्त्यातील दुचाकी काढण्यास सांगितल्याने सात जणांनी शेतकऱ्याला मारहाण करत कारच्या काचा फोडल्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रस्त्याच्या मध्यभागी उभी केलेली दुचाकी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरुन काही गुंड…

1 तास ago

अजितदादांच्या विमान अपघाताचे सत्य समोर आणणारच! जय पवारांचा निर्धार; CID तपासाचा घेतला आढावा

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय अजितदादा पवार यांनी आज पुण्यातील सीआयडी कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची…

3 तास ago

महाराष्ट्राला ‘झाडखाऊ’ मुख्यमंत्री नको! टोरंट प्रकल्पावरून हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर घणाघात

‘विकासाला विरोध नाही, विनाशाला विरोध’; कर्जत-भीमाशंकरमधील वृक्षतोडीची उद्या सपकाळ करणार पाहणी मुंबई: कर्जत-भीमाशंकर परिसरात प्रस्तावित…

3 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल! उमेश पाटील राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते, झिशान सिद्दीकींकडे मुंबईची धुरा

सुनेत्रा पवारांकडून नियुक्त्यांची घोषणा; पार्थ पवारांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महत्त्वाच्या संघटनात्मक…

3 तास ago

शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींना हात लावाल तर रस्त्यावर उतरू; विजय वडेट्टीवारांचा इशारा

गडचिरोली : प्रस्तावित विमानतळासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींचे अधिग्रहण करण्यास विरोध करत काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय…

3 तास ago

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र फोडून ५२० किलो तांब्याच्या तारांची चोरी…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यातील करडे येथे अज्ञात चोरट्यांनी विद्युत रोहित्र फोडुन त्यातील तब्बल…

9 तास ago