क्राईम

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र फोडून ५२० किलो तांब्याच्या तारांची चोरी…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यातील करडे येथे अज्ञात चोरट्यांनी विद्युत रोहित्र फोडुन त्यातील तब्बल ५२० किलो तांब्याच्या तारांवर डल्ला मारला. या चोरीत १ लाख ५६ हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारांचा ऐवज लंपास करण्यात आला असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

रांजणगाव औद्योगिक वसाहत टप्पा क्रं तीन करडे येथील स्टेरिऑन कंपनीच्या शेजारील शेड क्रमांक १३ च्या दक्षिणेकडील मोकळ्या जागेत ६३० केव्हीए क्षमतेचा विद्युत बसविण्यात आला आहे. याच ट्रान्सफॉर्मरचे झाकण उघडून अज्ञात चोरट्यांनी आतील तांब्याच्या तारा चोरुन नेल्या. दिनांक १९ ऑक्टोबर रोजी दुपारी ४:३० ते २० ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० दरम्यान हा चोरीचा प्रकार घडला आहे.

विद्युत रोहित्रा मधील तांब्याच्या ताराच लक्ष्य…
विद्युत रोहित्रा मधून चोरीला गेलेल्या तांब्याच्या तारांचे वजन अंदाजे ५२० किलो असून, त्यांची किंमत १ लाख ५६ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी नानासाहेब हरिभाऊ सोनवणे (वय ५०) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असुन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरट्यांचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान…
विद्युत रोहित्र फोडून तांब्याच्या तारांची चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. या चोरीमागे कोण आहे, तसेच चोरीचा मुद्देमाल कुठे नेण्यात आला, याचा तपास सुरु आहे. या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर करत आहेत.

शिक्रापूर पोलिसांच्या जाळ्यात अडकला दहा गुन्ह्यांचा आरोपी! पुण्यातून अटक…

शिरूर पोलिसांची दिपावलीच्या पार्श्वभुमीवर सराफ कट्टा व मुख्य बाजारपेठेत पायी गस्त…

विद्युत रोहित्र फोडून तांब्याच्या तारा चोरणाऱ्या सराईत टोळीचा अखेर पर्दाफाश!

मलठणमध्ये विद्युत रोहित्र फोडून तांब्याच्या तारा लंपास झाल्याने वीजपुरवठा खंडित

बाभुळसर-करडे अष्टविनायक महामार्गावर शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; रस्त्यातील दुचाकी काढण्यास सांगितल्याने सात जणांनी शेतकऱ्याला मारहाण करत कारच्या काचा फोडल्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रस्त्याच्या मध्यभागी उभी केलेली दुचाकी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरुन काही गुंड…

2 तास ago

अजितदादांच्या विमान अपघाताचे सत्य समोर आणणारच! जय पवारांचा निर्धार; CID तपासाचा घेतला आढावा

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय अजितदादा पवार यांनी आज पुण्यातील सीआयडी कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची…

4 तास ago

महाराष्ट्राला ‘झाडखाऊ’ मुख्यमंत्री नको! टोरंट प्रकल्पावरून हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर घणाघात

‘विकासाला विरोध नाही, विनाशाला विरोध’; कर्जत-भीमाशंकरमधील वृक्षतोडीची उद्या सपकाळ करणार पाहणी मुंबई: कर्जत-भीमाशंकर परिसरात प्रस्तावित…

4 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल! उमेश पाटील राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते, झिशान सिद्दीकींकडे मुंबईची धुरा

सुनेत्रा पवारांकडून नियुक्त्यांची घोषणा; पार्थ पवारांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महत्त्वाच्या संघटनात्मक…

4 तास ago

शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींना हात लावाल तर रस्त्यावर उतरू; विजय वडेट्टीवारांचा इशारा

गडचिरोली : प्रस्तावित विमानतळासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींचे अधिग्रहण करण्यास विरोध करत काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय…

4 तास ago

शिरूर तालुक्यात सामाईक विहिरीच्या पाण्यावरून वाद पेटला; दगड अन् कुऱ्हाडीने मारहाण…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात सामाईक विहिरीवरील पाण्याची मोटार बंद केल्याचा जाब विचारणे आणि…

9 तास ago