क्राईम

महिलेस मारहाण, पतीसह सासु सासऱ्यांवर गुन्हा दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरुर) येथील स्वाती प्रदिप थोरात या महिलेने तिचा पती प्रदिप गुलाब थोरात याला तुम्ही काही कामधंदा करत नाही रोजच दारु पिउन शिवीगाळ करताय. असे म्हणाल्याच्या कारणावरुन सदर महिलेला तिच्या सासु, सासऱ्याने व नवऱ्याने काठीने मारहाण करुन जखमी केले आहे. या महिलेची मुलगी ही मारामारी सोडवण्यासाठी मध्ये आली असता तिलाही काठीने मारहाण केली आहे.

याबाबत स्वाती प्रदिप थोरात (वय 40 )व्यवसाय अंगणवाडी सेविका रा. मलठण, थोरातवस्ती हीने आरोपी पती प्रदिप गुलाब थोरात, सासू सिंधुबाई गुलाब थोरात, सासरे गुलाब बाळाजी थोरात सर्व रा .मलठण, थोरातवस्ती (ता. शिरुर), जि. पुणे यांच्या विरोधात शिरुर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला केला.

याबाबत सविस्तर हकिगत अशी की, (दि.१८) रोजी रात्री ७:३० वा. चे सुमारास मौजे मलठण थोरातवस्ती (ता. शिरुर) जि. पुणे येथे राहते घरी फिर्यादी महीला घरात झाडु मारत असतांना पती प्रदिप गुलाब थोरात हे फिर्यादी व तिची मुलगी सिद्धी हिस शिवीगाळ करत होते म्हणुन या महिलेने त्यांना तुम्ही काही कामधंदा करत नाही रोजच दारु पिउन शिवीगाळ करताय असे म्हणालेचे कारणावरुन सासु सिंधुबाई गुलाब थोरात, सासरे गुलाब बाळाजी थोरात यांनी फिर्यादीला हाताने धरले व पती प्रदिप यांनी काठीने उजवे हातावर मारहाण करुन जखमी केले आहे. तिची मुलगी सिद्धी ही सोडविण्यासाठी मध्ये आली असता तिलाही काठीने हाताने मारहाण केली आहे. पुढील तपास टाकळी हाजी औटपोस्टचे पोलिस हवालदार अनिल आगलावे हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

16 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

22 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

22 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

23 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

23 तास ago