मुख्य बातम्या

शिरुरच्या कांदा मार्केटवर आत्ता होणार दररोज जाहीर लिलाव

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर कृषि उत्पन्न बाजार समिती, शिरुर जि. पुणेचे नविन मार्केट यार्डवर भरणाच्या कांदा मार्केट मध्ये दिवसेंदिवस कांद्याची आवकेमध्ये लक्षणीय वाढ होत असुन आठवड्याचे काही ठरावीक दिवस असलेमुळे अनेक शेतकरी, खरेदीदार वाहतुकदार यांची कांदा विक्रीसाठी आणताना कुचंबना होत होती. त्यांनी याबाबत बाजार समिती तसेच आडतदारांकडे दररोज कांदा मार्केट सुरु करण्याची मागणी करत होते. त्यास अनुसरुन सर्व बाजार घटकांसोबत चर्चा होऊन येथुन पुढे शिरुरचे नविन मार्केट यार्डमध्ये कांद्याचे जाहीर लिलाव आठवड्यातील शनिवार वगळता दररोज भरणार आहे.

कांदा मार्केटमध्ये दररोज नविन कांद्याची सुमारे ६५०० पिशवीची आवक असुन बुधवार दि. १८ जानेवारी २०२३ रोजी चांगल्या प्रतीच्या कांद्यास रु.१५०० ते १७५० प्रती क्विंटल याप्रमाणे दर मिळाला. शिरुर येथे परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये पिकविलेल्या कांद्यासाठी जवळची आपल्या हक्काची बाजारपेठ मिळालेली असुन शेतकरी वर्ग अत्यंत समाधानी आहे. तसेच शेतकऱ्यांचा वाहतुक खर्च व वेळेची मोठी बचत होत असुन उत्पन्नात भरीव अशी वाढ होत आहे, असे यार्डवर कांदा विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांनी सांगीतले. कांदा हे पिक शेतकऱ्यांचे नगदी पिक असून शिरुर यार्डवर शिरुर, पारनेर, श्रीगोंदा, खेड, दौंड, जुन्नर तालुक्यातुन शेतकऱ्यांना जवळचे मार्केट असल्यामुळे चांगली आवक होत आहे.

बाजार समितीने यार्डवर शेतकऱ्यांचा कांदा उतरविणेसाठी प्रशस्त असे चार शेड, लाईट, स्वच्छतागृह, सी.सी.टी.व्ही. इत्यादी आवश्यक त्या पायाभुत सुविधा उभारलेल्या आहेत. पुणे व शेजारील अहमदनगर, नाशिक जिल्ह्यामध्ये हळवा व गरवा जातीचा डबल पत्ती असणाऱ्या कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. हा कांदा टिकाऊ असुन त्यास चांगली मागणी असते. यावरील कांदा कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ, तामीळनाडु, पश्चिम बंगाल, झारखंड, आसाम तसेच राजस्थान, दिल्ली, जम्मु काश्मिर इत्यादी राज्यामध्ये विक्रीसाठी जात असतो.

शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतमाल यार्डवरच विक्रीसाठी आणावा. शेतावर कांदा विक्री केलेल्या अनेक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे फसवणुक केलेच्या तक्रारी बाजार समितीकडे येत असुन त्यांनी वजन, बाजारभाव तसेच विक्रीच्या रक्कमा याबाबत फसवणुक होऊ शकते.. त्यासाठी शिरुर बाजार समितीचे नविन मार्केट यार्डवर रविवार ते शुक्रवार दररोज सकाळी १० चे आत कांदा विक्रीसाठी आणणेचे आवाहन बाजार समितीचे प्रशासक शंकर कुंभार यांनी केले.

तसेच कांदा विक्रीसाठी आणताना वाळवून, निवडुण गुलटी, दुभळका वेगवेगळ्या बारदाण्यात प्रतवारी करुन आणावा. यार्डवर कांदा विक्रीचे दर हे नेहमी इतर मार्केटपेक्षा जास्तच निघत असल्याचे सचिव अनिल ढोकले यांनी सांगीतले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

58 मिनिटे ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

5 तास ago