क्राईम

प्रेमाविवाह केलेल्या दाम्पत्याला मारहाण-अपहरणाची घटना; अवघ्या 24 तासात प्रकरणाला वेगळं वळण

पुणे: पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खरपुडी गावात आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यावर हल्ला झाल्याची आणि पत्नीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर, या प्रकरणात एक मोठे वळण आले आहे. अपहरण झालेली पत्नी प्राजक्ता गोसावी ही स्वतः तिच्या कुटुंबीयांसोबत खेड पोलीस स्टेशनला हजर झाली.

या प्रकरणी पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राजक्ताने पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “माझे अपहरण झाल्यानंतर कुटुंबीयांनी मला समजावले. आता आमच्यातील कटुता संपली असून, ते माझ्या पतीला स्वीकारतील.” या विधानामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये समेट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नेमकी काय घडली होती घटना?

या प्रकरणातील पीडित पती विश्वनाथ गोसावी आणि प्राजक्ता यांनी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर ते दोघे खरपुडी येथे राहत होते. रविवारी सायंकाळी प्राजक्ताचे कुटुंबीय आणि इतर काही लोकांनी गावात येऊन विश्वनाथला जबर मारहाण केली आणि प्राजक्ताचे अपहरण केले होते. या घटनेनंतर खेड पोलीस ठाण्यात प्राजक्ताचा भाऊ, आई आणि इतर मिळून एकूण 15 जणांविरोधात अपहरण आणि गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार

प्राजक्ताने स्वतः हजर होऊन समेटाची भूमिका घेतली असली, तरी पोलिसांनी कायद्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे. अपहरणाच्या तक्रारीनुसार, संबंधित आरोपींना उद्या न्यायालयात हजर केले जाईल. त्यानंतर न्यायालय जो निर्णय देईल, त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, उद्याच या दाम्पत्याचा लग्नाचा वाढदिवस आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

16 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

16 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

16 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

16 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

16 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

20 तास ago