महाराष्ट्र

शिवसेना जनतेच्या दारी’ अभियानाचा राज्यभर विस्तार; शिंदेंकडून विकास, जनसेवा आणि युवा सक्षमीकरणाचा मंत्र

नेस्कोतील कार्यक्रमात २० हजार नागरिकांना शासकीय लाभांचे वितरण; दापोलीतील मीनाताई ठाकरे नाट्यगृहासाठी १५ कोटींची घोषणा

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास, जनसेवा आणि युवा सक्षमीकरण ही महायुती सरकारची त्रिसूत्री असल्याचे सांगत ‘शिवसेना जनतेच्या दारी – एक पाऊल ध्येयपूर्तीकडे’ हे अभियान राज्यभर प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले. मुंबईतील नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी एका दिवसात २० हजारांहून अधिक नागरिकांना ज्येष्ठ नागरिक कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड तसेच विविध शासकीय दाखल्यांचे वितरण करण्यात आले. शासनाच्या योजना शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी हे अभियान महत्त्वाची भूमिका बजावेल, असे शिंदे यांनी सांगितले.

युवकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), स्टार्टअप, इनोव्हेशन आणि ग्रीन टेक्नॉलॉजीसारख्या क्षेत्रात पुढाकार घ्यावा, असे आवाहन करत “आकाशाला गवसणी घाला; पण पाय जमिनीवर ठेवा,” असा संदेश त्यांनी दिला.

२०२२ नंतर जनतेने शिवसेनेच्या कामावर विश्वास दाखविल्याचा उल्लेख करत, “आमचा अजेंडा सत्ता नव्हे, तर महाराष्ट्राचा विकास आहे,” असे शिंदे म्हणाले. शिवसेना ही केवळ निवडणुकांपुरती मर्यादित नसून वर्षभर जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असलेली संघटना असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात शिवसेना नेते रामदास कदम यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. दापोली येथील मीनाताई ठाकरे नाट्यगृहासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची घोषणा करत संबंधित शासन निर्णय (जीआर) त्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष तथा शिवसेना सचिव सिद्धेश कदम यांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या उपक्रमाचेही शिंदे यांनी कौतुक केले. २५० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, २० हजार नागरिकांना विविध शासकीय लाभांचे वितरण आणि राज्यभर ‘शिवसेना जनतेच्या दारी’ अभियान राबविण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत ४५० कोटी रुपयांच्या स्वच्छता यंत्रसामग्री उपक्रमाची माहितीही देण्यात आली.या कार्यक्रमाला रामदास कदम, गजानन कीर्तिकर, सिद्धेश कदम, शीतल म्हात्रे, सचिन अहिर, रवींद्र वायकर, मनीषा कायंदे, प्रकाश सुर्वे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

10 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

10 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

10 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

10 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

10 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

14 तास ago