शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे जगताप (ता. शिरुर) नजीक भारत गॅस फाटा येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन युवतीवर लग्नाच्या आमिषाने अत्याचार केल्याने अल्पवयीन युवती गरोदर राहिल्याने घटनेला वाचा फुटल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे संकेत बबन कुसाळकर या युवकावर बलात्कार सह बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आले.
पिंपळे जगताप (ता. शिरुर) नजीक भारत गॅस फाटा येथे राहणाऱ्या अल्पवयीन युवतीची ओळख संकेत कुसाळकर याच्या सोबत झाली त्यानंतर संकेत याने युवतीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. सदर घडलेल्या प्रकाराने अल्पवयीन युवती गरोदर राहिली. मात्र संकेत हा तिच्याशी लग्न करण्यास टाळाटाळ करु लागला.
दरम्यान घडलेल्या प्रकाराबाबत युवतीने तिच्या आईला सर्व माहिती दिल्याने युवतीच्या आईने युवतीसह शिक्रापूर पोलीस स्टेशन गाठत घडलेल्या प्रकाराबाबत फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी संकेत बबन कुसाळकर (वय २१) रा. पिंपळे जगताप (ता. शिरुर) जि. पुणे याचे विरुद्ध गुन्हे दाखल करत त्याला तातडीने अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे व पोलीस शिपाई अविनाश पठारे हे करत हे.
मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…
मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…
मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…
मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…
नागपूर, वर्धा, हिंगोली आणि जालना जिल्ह्यांतील शेतकऱ्यांशी साधणार संवाद मुंबई: महाराष्ट्र लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती, निवडणूक आयोगाच्या कारभारातील कथित अनियमितता आणि MPSC अध्यक्षांच्या कार्यकाळातील गैरप्रकारांच्या चौकशीवरून…