क्राईम

शिंगाडवाडीत मुलगा व सुनेकडून महिलेला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): शिंगाडवाडी (ता. शिरुर) येथे किरकोळ वादातून जन्मदात्या मुलासह सुनेने महिलेला मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तुळशीराम रघुनाथ शिंगाडे व सुनिता तुळशीराम शिंगाडे या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिंगाडवाडी (ता. शिरुर) येथील संगीता शिंगाडे यांना गावी जायचे असल्याने त्यांनी त्यांचा मुलगा तुळशीराम व सुनिता यांच्याकडे पैसे मागितले. दरम्यान त्यांच्यात वाद झाला, यावेळी तुळशीराम व सुनिता या दोघांनी महिलेला शिवीगाळ, दमदाटी करत लाकडी दांडक्याने मारहाण करत जखमी केले.

घडलेल्या प्रकाराबाबत संगीता तुळशीराम शिंगाडे (वय ४०) रा. शिंगाडवाडी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी तुळशीराम रघुनाथ शिंगाडे व सुनिता तुळशीराम शिंगाडे दोघे रा. शिंगाडवाडी (ता. शिरुर) जि. पुणे या दोघांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मंगेश लांडगे हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

इम्यूनिटी बुस्ट करण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींपासून तयार करा काढा

पावसाळ्यात पावसामुळे निसर्ग मस्त हिरवेगार बनते, त्यासोबतच उन्हाळ्यानंतर आपल्याला मानसिक शांतीही मिळते. पण त्याचबरोबर पावसाळ्यात…

2 तास ago

रोज रात्री पायाला तेलानं मालिश करा, तब्येत कायमची सुधरवून टाकणारा पाहा सोपा उपाय

तब्येत सांभाळण्यासाठी लोकांना पुरेसा वेळ मिळत नाही. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आयुर्वेदात अशा…

3 तास ago

लहान मुलांसह त्यांच्या आईबाबांचाही ब्रेन रॉट नावाचा आजार कसा ओळखाल

खूप मोबाईल किंवा टीव्ही पाहतात म्हणून फक्त लहान मुलांनाच दोष देऊन उपयोग नाही. कारण त्यांच्या…

3 तास ago

४० कोटींच्या कथित कर्ज घोटाळा प्रकरणात अरविंद पाटील निलंगेकरांना दिलासा नाही

दोषमुक्तीचा अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळला नाशिक: युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या…

3 तास ago

शिक्षकांच्या प्रश्नांना सरकारचे प्राधान्य; सरनाईक यांच्या विजयासाठी शिंदेंचे आवाहन

अमरावती: शिक्षकांच्या प्रश्नांना सरकार प्राधान्य देईल आणि महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी वचननाम्यात दिलेली आश्वासने…

3 तास ago

संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे संघर्ष करावा; विजय वडेट्टीवार

अमरावती: देशातील लोकशाही व्यवस्था, भारतीय संविधान आणि बहुजन समाजाचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे…

3 तास ago