क्राईम

दुकानात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लग्नाच आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार

दौंड: दौंड शहरातील कुंभार गल्ली परिसरात एका दुकानात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून मालकाने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करत विश्वासघात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

संबंधित तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेच्या विश्वासाचा गैरफायदा घेत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला, असा आरोप आहे. या घटनेमुळे स्थानिक व्यापारी वर्ग आणि नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून दौंड पोलिसांनी जय कमल मोटवाणी (वय २५, रा. जनता कॉलनी, बंगला साईड, दौंड) याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) अंतर्गत आणि संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात त्वरित कारवाई करत आरोपीला शुक्रवारी रात्री अटक केली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ऑगस्ट २०२४ पासून सुरू होऊन काही आठवड्यांपूर्वीपर्यंत सुरू होती. आरोपीने पीडिता अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही तिला लग्नाचे आश्वासन दिले होते. या आधारे तिचा विश्वास जिंकून वारंवार संपर्क ठेवण्यात आला, असे पोलिस तपासात समोर आले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी काही काळ फरार होता. मात्र, दौंड पोलिसांनी सतर्कता दाखवत त्याला शिताफीने ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago