क्राईम

त्या महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस 24 तासांच्या आत अटक

लोणावळा: दिनांक 15/07/2025 रोजी दुपारी 02:00 वाजेच्या सुमारास लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे ह‌द्दीतील ठाकुरसाई गावात एका 33 वर्षीय महिलेस रस्त्यात आडवून निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एक अनोळखी इसमास केवळ 24 तासांत अटक करण्यात आली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गु.र.नं. 190/2025 नोंदवण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून मा. संदीप सिंह गिल्ल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी गुन्हयातील आरोपीताचा तात्काळ शोध घेण्याबाबत आदेश दिल्याने मा. श्री. रमेश चोपडे अपर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा. अमोल मांडवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, लोणावळा विभाग, मा. अविनाश शिळीमकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण, श्री. दिनेश तायडे, पोलीस निरीक्षक, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन यांनी स्वतः गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देवून स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण व लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार यांची तपास पथके तयार करून आरोपीचा शोध घेतला. घटनास्थळावरील परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे व गोपनीय बातमीदार यांच्या मदतीने सदर गुन्हयातील नराधम आरोपी यास २४ तासांच्या आत ताब्यात घेण्यात आलेले आहे. सदर आरोपीचे नाव बाळु दत्तु शिर्के रा. जिवन नं. 01, ता. मावळ जि. पुणे असे असून त्याला अटक करण्यात आलेली आहे.

सदरची कामगीरी ही मा. श्री. संदीपसिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली, मा. रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण तसेच मा. अमोल मांडवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, लोणावळा विभाग यांच्या देखरेखीखाली पोलीस निरीक्षक श्री. अविनाश शिळीमकर, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण, पोलीस निरीक्षक श्री. दिनेश तायडे, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन, सहा. पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत आवारे, सहा. पोलीस निरीक्षक राहुल गावडे, महिला सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती विजया म्हेत्रे, सहा. पोलीस निरीक्षक श्री. दत्ताजीराव मोहिते, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सांवत, पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रकाश वाघमारे, सहा. फौ. सचिन घाडगे, दिपक साबळे, आसिफ शेख, पोहवा विक्रम तापकिर, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, अतुल ढेरे, तुषार भोईटे, सागर नामदास, राहुल पवार, संदीप वारे, रामदास बाबर, सिताराम बोकड, जय पवार, केतन तळपे, अंकुश नायकुडे, पोलीस नाईक किशोर पवार, पोलीस कॉन्स्टेबल निलेश सुपेकर, अक्षय नवले, वैभव सावंत, राहुल खैरे, संजय पंडीत, सतीश कुदळे, अंकुश पवार, सागर धनवे यांनी केलेली आहे. गुन्हयाचा पुढील तपास महिला सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती विजया म्हेत्रे या करीत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

4 तास ago

प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…

4 तास ago

शिरुर; शेतीपंपांच्या रात्रीच्या वीज वेळापत्रकात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी; दिवसा ८ तास अन रात्री ६ तास वीज

बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…

5 तास ago

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

9 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

9 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

10 तास ago