क्राईम

ट्रॅव्हल्समधून नवजात बाळाला कपड्यात बांधत गाडीतून बाहेर फेकल अन्…

पुणे: पुण्याहून परभणीला जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्समध्ये 19 वर्षीय तरुणीनं नवजात बाळाला कपड्यात बांधत गाडीच्या बाहेर फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. महिला नुकतीच प्रसूत झाली होती.

पुण्याहून परभणीला येणाऱ्या परभणीच्या पाथरी तालुक्यातील देवनांद्रा परिसरात हा प्रकार घडला असून पोलिसांनी ट्रॅव्हल्सचा पाठलाग करत दोघांना ताब्यात घेत महिलेला रुग्णालयात दाखल केले. बाळाचं पालनपोषण न करण्याच्या उद्देशातून नवजात बाळाला काळसर कपड्यात गुंडाळून चालत्या ट्रॅव्हल्समधून फेकून विल्हेवाट लावल्याप्रकरणी गंभीर गुन्ह्यांची नोंद केलीय. ऋतिका ढेरे आणि अल्ताफ शेख असे दोन्ही आरोपींची नावं आहेत.

नेमका प्रकार काय

ऋतिका ढेरे (वय १९) आणि तिचा साथीदार अल्ताफ मेहनुद्दीन शेख हे दोघं मागील काही महिन्यांपासून पुण्यात एकत्र राहत होते. त्यांनी लग्न केल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. आज पहाटे ‘संत प्रयाग ट्रॅव्हल्स’ ने हे दोघं पुण्याहून परभणीकडे निघाले होते. पाथरी तालुक्यातील देवनांद्रा शिवाराजवळ गाडी आली असता ऋतिकाची अचानक प्रसूती झाली. प्रसूतीनंतर त्या तरुणीनं नवजात अर्भकाला काळसर आणि निळसर कपड्यांमध्ये गुंडाळून, थेट चालत्या गाडीमधून रस्त्यावर फेकून दिलं. या अमानुष कृत्याचा प्रत्यक्षदर्शी झालेल्या एका नागरिकानं तत्काळ पाथरी पोलिसांना याबाबत माहिती दिली. बाळ जिवंत आहे की नाही याबाबत अद्याप माहिती नाही.

पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप, दोघांना ताब्यात

माहिती मिळताच पोलीस कर्मचारी अमोल जयस्वाल यांच्या पथकानं तत्काळ ट्रॅव्हल्सचा पाठलाग करून गाडी थांबवली. गाडीतून संबंधित तरुणी व तिचा साथीदार अल्ताफ शेख यांना ताब्यात घेण्यात आलं. ऋतिका ढेरे हिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ९४(३)(५) अंतर्गत दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवजात अर्भकाला मुद्दाम विल्हेवाट लावण्याच्या उद्देशानं हे कृत्य केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी दोघांना नोटीस देऊन चौकशी सुरू केली आहे.या संतापजनक घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, अर्भकाबाबत न्यायवैद्यकीय प्रक्रिया सुरू आहे. समाजात जागरूकता आणि कठोर कायद्याची गरज या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

13 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

14 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

14 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

15 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

15 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

15 तास ago