आरोग्य

नखे कापताना का दुखत नाहीत

नख कापताना नख कापण्याऐवजी उपटले गेल्याने वा ओढले गेल्याने दुखते. अगदी ब्लेडने नख कापले तरी रक्त येत नाही वा दुखत नाही. मग उपटल्यावर वा ओढल्यावर ते का दुखते? नखे, केस, घामाच्या ग्रंथी, तैलग्रंथी हे त्वचेचेच भाग आहेत. त्वचेतील पेशींपासून निर्माण होणार्‍या केरॅटीनच्या जाडसर थराने नख तयार होते. वरची बाजू सोडल्यास उर्वरीत तिन्ही बाजूंनी नखाभोवती त्वचेच्या घड्या असतात.

केरॅटीनच्या थराला वेदनेची जाणीव नसते, कारण तो मृत भाग असतो. त्यात सजीव पेशी नसतात. नखात पोषणासाठी रक्तवाहिनी नसते किंवा संवेदना जाणवण्यासाठी मज्जातंतूही नसतात. त्यामुळे नख कापले तरी दुखत नाही. नखाच्या बोटाकडच्या भागाला नखाचे मूळ म्हणतात. येथूनच पेशींच्या थरापासून नखाची निर्मिती होत असते. या भागातील पेशी मात्र जिवंत असतात व त्यांना रक्तपुरवठा आणि मज्जातंतूंचाही पुरवठा असतो. नखाचा आपल्याला न दिसणारा आतला भाग त्याखालील नाजूक त्वचेत गुंतलेला असतो. साहजिकच नख उपटल्यास वा ओढले गेल्यास वेदनेची जाणीव होते. नखे कापताना मात्र आपण नखाचा निर्जीव भागच कापत असतो, त्यामुळे दुखत नाही.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

11 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

19 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago