क्राईम

चौथ्या मजल्यावरून पडून सहा वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

नाशिक: नाशिक शहरात एक हृदयद्रावक घटना घडली असून, खेळता खेळता इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडून सहा वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पाथर्डी फाटा परिसरात शोककळा पसरली आहे.

पाथर्डी फाटा येथील नरहरी नगर परिसरातील एका इमारतीत ही दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. कियान्श प्रफुल्ल बेदाडे (वय ६ वर्षे, रा. शिवगंगा रेबिन्यू, नरहरी नगर, पाथर्डी फाटा, नाशिक) असे मृत बालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कियान्श हा आपल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील घराच्या गॅलरीमध्ये खेळत होता. खेळताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो थेट खाली जमिनीवर कोसळला. चौथ्या मजल्यावरून पडल्याने तो गंभीर जखमी झाला होता.

घटना लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने बेदाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. कियान्शच्या आईने फोडलेला हंबरडा उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. कियान्श हा आपल्या आई व दोन बहिणींसोबत नाशिकमध्ये राहत होता, तर त्याचे वडील कामानिमित्त मनमाड येथे वास्तव्यास आहेत. कियान्श हा बेदाडे कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता.या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

8 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

16 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago