बीड: संपूर्ण देश प्रजासत्ताक दिनाचा उत्साह साजरा झाला. अशात बीड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एक अजब प्रकार उघडकीस आला. इथं एका तरुणाने थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून आंदोलन केलं आहे.
त्याने इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्येची धमकी दिल्याने प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली. “माझी पत्नी नांदत नाही, पोलिसांनी माझा संसार बसवून द्यावा,” अशी मागणी करत नितीन उबाळे नावाच्या तरुणाने हा प्रकार केला. त्याच्या ‘शोले’ स्टाईल आंदोलनामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
नेमकी मागणी काय?
नितीन उबाळे हा तरुण गेल्या अनेक दिवसांपासून कौटुंबीक समस्येमुळे त्रस्त आहे. त्याची पत्नी त्याच्यासोबत राहत नसून ती नांदायला तयार नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. आपला संसार पुन्हा सुरळीत व्हावा, यासाठी तो वारंवार प्रशासनाकडे आणि पोलिसांकडे साकडे घालत आहे. मात्र, मागणी मान्य होत नसल्याने त्याने थेट जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत गाठली आणि टोकाचा निर्णय घेतला.
धक्कादायक बाब म्हणजे नितीनने आत्महत्येचा प्रयत्न करण्याची ही पहिली वेळ नाही. पत्नी नांदत नसल्याच्या कारणावरून यापूर्वी त्याने पाच वेळा वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या पद्धतीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण प्रत्येक वेळी पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून त्याला वाचवले होते. मात्र, आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून त्याने सहाव्यांदा अशाप्रकारे टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला.
“तुला न्याय मिळवून देऊ, तुझ्या पत्नीशी चर्चा करू, पण तू खाली उतर,” अशी विनवणी पोलिसांकडून केली जात आहे. मात्र, नितीन आपल्या मागणीवर ठाम असल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेने बीडमध्ये चर्चेला उधाण आलं आहे.
नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…
ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…
शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…
मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…
आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…
खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…