शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील चौकातून चार महिन्यांपूर्वी 1 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज चोरुन फरार झालेल्या आरोपीला जेरबंद करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले असून आकाश उर्फ बंटी भवरसिंग राजपूत असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या फरार आरोपीचे नाव आहे.
सणसवाडी ता. शिरुर येथे बलेंदर यादव यांचे पानाचे दुकान असून २४ जुलै २०२२ रोजी सकाळच्या सुमारास दुकानाचे शटर उचकटलेले दिसल्याने दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आले त्यावेळी पाहणी केली असता दुकानातील एक लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
याबाबत बलेंदर राजकिशोर यादव (वय ३२) रा. सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल केले, सदर गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक रविकिरण जाधव हे करत असताना आकाश उर्फ बंटी राजपूत याने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. मात्र सदर आरोपी वारंवार फरार होत होता. त्यानंतर आकाश हा पुणे येथे येणार असल्याची माहिती पोलीस नाईक रविकिरण जाधव व किशोर शिवणकर यांना मिळाल्याने त्यांनी पुणे येथे जात आकाश उर्फ बंटी भवरसिंग राजपूत (वय १९) रा. विद्यानगर चिंचवड पुणे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रविकिरण जाधव हे करत आहे.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…