क्राईम

डोळा लागला अन् घात झाला; PSI अश्विनीचा मृत्यू कसा झाला

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) २०२३ मधील पोलिस उपनिरीक्षक (PSI) परीक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवणारी अश्विनी बाबुराव केदारी (वय ३०) यांचा एका दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. नाशिक येथे PSI प्रशिक्षण घेत असताना गणेशोत्सवासाठी दोन दिवसांच्या सुट्टीवर गावी आलेल्या अश्विनीवर काळाने घाला घातला.

२८ ऑगस्ट रोजी सकाळी आंघोळीसाठी पाणी गरम करताना हिटरमुळे झालेल्या अपघातात ती ८० टक्के भाजली, आणि उपचारादरम्यान दहा दिवसांनी तिचा मृत्यू झाला. या घटनेने खेड तालुका आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

नेमकं काय घडल

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पाळू या दुर्गम गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अश्विनीने आपल्या जिद्दीने आणि हुशारीने PSI परीक्षेत यश मिळवले होते. नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीत तिचे प्रशिक्षण सुरू होते. गणेशोत्सवासाठी ती २७ ऑगस्टला गावी आली. दुसऱ्या दिवशी, २८ ऑगस्टला सकाळी माघारी जाण्याच्या तयारीत ती आंघोळीसाठी पाणी गरम करत होती.

पाण्यात हिटर लावून ती पुन्हा झोपी गेली. जाग आल्यानंतर पाणी उकळत असल्याचे पाहून तिने हिटर बंद केले आणि गरम पाण्याची बादली उचलण्याचा प्रयत्न केला. याचवेळी तिचा पाय घसरला, आणि उकळत्या पाण्याची बादली तिच्या अंगावर सांडली. या अपघातात ती ८० टक्के भाजली.

अपघातानंतर अश्विनीला तातडीने मोशी येथील धनश्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. नंतर तिच्यावर पिंपरी-चिंचवड येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात पुढील उपचार सुरू झाले. सुमारे दहा दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या अश्विनीवर रुग्णालयात कसून उपचार करण्यात आले. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी तिच्या उपचारांसाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले, आणि अनेकांनी पुढाकार घेत मदतही केली. मात्र, सर्व प्रयत्नांना अपयश आले, आणि उपचारादरम्यान अश्विनीचा मृत्यू झाला.

जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न धूसर

अश्विनी ही सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी होती, पण तिची बुद्धिमत्ता आणि मेहनत यामुळे तिने PSI परीक्षेत मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तिचे स्वप्न केवळ PSI बनण्यापुरते मर्यादित नव्हते; तिला उपजिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी होण्याची इच्छा होती. त्या दिशेने ती अथक परिश्रम करत होती. तिच्या यशाने खेड तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली होती. मात्र, एका छोट्या अपघाताने तिचे स्वप्न आणि आयुष्य अपूर्ण राहिले.

अश्विनीच्या मृत्यूने पुन्हा एकदा हिटरद्वारे पाणी तापवण्याच्या धोकादायक पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ग्रामीण भागात अजूनही अनेक ठिकाणी हिटरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो, पण यामुळे होणाऱ्या अपघातांबाबत पुरेशी जनजागृती नाही. अश्विनी ही अशा अपघाताची पहिली बळी नाही; यापूर्वीही अनेकांनी हिटरमुळे जीव गमावला आहे. या घटनेने प्रशासन आणि समाजाला सुरक्षित पर्याय आणि जनजागृतीच्या गरजेची आठवण करून दिली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवसा घरफोडीचा थरार! शेतात गेलेल्या कुटुंबाचा फायदा घेत १७ तोळे सोन्यावर डल्ला; शिरूर तालुक्यात खळबळ

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील संविदणे गावात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…

10 तास ago

भारतातील सायबर फसवणुकीचा पैसा शिरूरच्या बँकेत; रॅकेट उघडकीस…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : भारतात सायबर गुन्हेगारीने धोकादायक स्वरूप धारण केले असून, ऑनलाइन फसवणुकीतून उकळलेली…

11 तास ago

शिरूर तालुक्यात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळसुटी येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने…

11 तास ago

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

1 दिवस ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

1 दिवस ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड; पाहा Video

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

1 दिवस ago