आरोग्य

डोळा फडफडण्याचा शकुन- अपशकुनाशी संबंध नाही, ‘या’ दोन व्हिटॅमिनची कमतरता तुम्हाला छळतेय…

‘डोळे’ हे आपल्या सगळ्यात महत्वांच्या अवयवांपैकी एक. डोळे फारच नाजूक असल्याने त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. अनेकदा आपल्याला डोळ्यांशी संबंधित अनेक लहान – मोठ्या समस्या फार त्रास देतात. डोळे फडफडण्याची समस्या ही डोळ्यांच्या समस्यांपैकी एक फारच कॉमन आणि सगळ्यांना सतावणारी समस्या आहे. अनेकदा आपला डोळा फडफडतो, परंतु आपण या समस्येकडे कायमच दुर्लक्ष करतो.

आपल्याकडे तर काहीजण याला शकुन – अपशकुन किंवा अंधश्रद्धेचा भाग समजून थट्टा मस्करी करतात. पण प्रत्यक्षात, ही शरीरात काही महत्त्वाच्या पोषणतत्त्वांची कमतरता असल्याचे संकेत असू शकतात. विशेषतः व्हिटॅमिन बी १२ आणि मॅग्नेशियम यांची कमतरता असली की स्नायूंवर परिणाम होतो, ज्यामुळे डोळा सतत फडफडतो. वेळेवर लक्ष न दिल्यास ही समस्या वाढू शकते आणि इतर त्रास उद्भवू शकतात. याचबरोबर, ही समस्या वरचेवर वारंवार होत राहिल्यास थकवा, चक्कर, त्वचेचा कोरडेपणा किंवा निद्रानाशासारखे गंभीर त्रासही जाणवू शकतात. त्यामुळे अशा छोट्या वाटणाऱ्या लक्षणांकडे वेळेवर लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे!

1) डोळे नेमकं का फडफडतात

नुकतेच प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट लीमा महाजन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमधून एक महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. त्यांनी स्पष्ट केलं आहे की डोळा वारंवार फडफडण्याची समस्या आपण फारशी गंभीरपणे घेत नाही, पण यामागे मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी १२ या पोषकद्रव्यांची कमतरता असू शकते.

२) मॅग्नेशियमची कमतरता झाल्यास काय होत

मॅग्नेशियमची हा शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचा खनिज घटक आहे. याच्या कमतरतेमुळे स्नायूंना योग्य प्रकारे काम करण्यात अडथळा येतो आणि मज्जासंस्थेच्या कार्यावर परिणाम होतो. यामुळे डोळ्यांच्या आजूबाजूच्या स्नायूंवर ताण येतो आणि डोळा वारंवार फडफडतो.

३) मॅग्नेशियमची वाढवण्यासाठी काय खाव

शरीरात मॅग्नेशियमची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात काही नैसर्गिक आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. न्यूट्रिशनिस्टच्या मते, भोपळ्याच्या बिया, केळं आणि पालक हे मॅग्नेशियमचे उत्तम स्रोत आहेत. हे पदार्थ नियमित आहारात घेतल्यास मॅग्नेशियमची कमतरता दूर होण्यास मदत होते आणि डोळा फडफडण्याच्या त्रासापासूनही आराम मिळतो.

४) व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे काय होत

व्हिटॅमिन बी १२ शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे. याच्या कमतरतेमुळे थकवा, अशक्तपणा, मज्जासंस्थेशी संबंधित समस्या, आणि स्नायूंमध्ये क्रॅम्स यांसारख्या समस्या सतावतात. याशिवाय, डोळा वारंवार फडफडणे हे देखील व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असल्याचे लक्षण असू शकते.

५) व्हिटॅमिन बी १२ वाढवण्यासाठी आहारात काय खावे 

शरीरातील व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी दूध आणि दुधापासून तयार केलेले पदार्थ जसे की दही, पनीर हे नियमितपणे खाणे फायदेशीर ठरते.

या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवा…

जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफी पिणे देखील डोळा फडफडण्याचे कारण असू शकते. यात असलेला कॅफीन मसल्समध्ये ताण वाढवतो, ज्यामुळे डोळा फडफडू शकतो. तसेच, नीट झोप न लागणे हे सुद्धा यामागचं महत्त्वाचं कारण असू शकतं. त्यामुळे दररोज किमान ७ ते ८ तासांची शांत झोप घेणे आवश्यक आहे. यामुळे डोळ्यांची थकवा, तणाव आणि फडफडण्यासारखे त्रास दूर होण्यास मदत होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…

16 तास ago

अहिल्यानगर हादरले! चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या; एफडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

16 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

20 तास ago

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…

21 तास ago

ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…

21 तास ago

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…

21 तास ago