क्राईम

पुण्यात गणपती विसर्जन पाहण्यासाठी गेलेल्या मामी-भाचीचा ट्रकच्या धडकेत मृत्यू

पुणे: पुणे जिल्ह्यातील भोसरी येथे गणेश विसर्जन पाहण्यासाठी गेलेल्या नांदेडच्या मामी-भाचीचा ट्रकच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ६ सप्टेंबर रोजी रात्री १० च्या सुमारास घडली. या अपघातात मामी प्रतिभा आंबटवार (वय ३२) आणि भाची कादंबरी गादेकर (वय १८, दोघी रा. बळीरामपूर, ता. नांदेड) यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

बळीरामपूर येथील कृष्णा आंबटवार हे भोसरी येथे एका खासगी कंपनीत नोकरीस आहेत. ते आपल्या पत्नी प्रतिभा आंबटवार व मुलीसह भोसरी येथे वास्तव्यास होते. ६ सप्टेंबर रोजी श्री गणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी प्रतिभा आणि तिची भाची कादंबरी गादेकर काही नातेवाईकांसोबत बाहेर पडल्या होत्या.

दरम्यान, विसर्जन मार्गावर असलेल्या एका टी पॉईंटजवळ एका ट्रकने वळण घेताना समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेच्या वेळी प्रतिभा आणि कादंबरी मधोमध सापडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी दोघींनाही मृत घोषित केले.

या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी, ७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता बळीरामपूर येथील स्मशानभूमीत दोघींवर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यावेळी नातेवाईक, ग्रामस्थ आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत वातावरण अत्यंत भावूक झाले होते. मयत प्रतिभा आंबटवार यांच्या मागे सात वर्षांची कृषी ही मुलगी आहे. एकाच वेळी दोन निष्पाप जीवांचा जाणे, त्यातही उत्सवाच्या पार्श्वभूमीवर, ही अत्यंत दुर्दैवी बाब असून या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…

38 मिनिटे ago

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

17 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

21 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

21 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

21 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

21 तास ago