liquor
शिरूर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात अवैध दारु विक्री विरोधात पोलिसांनी जोरदार कारवाया सुरु केल्या असुन दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत देशी आणि विदेशी दारुचा साठा जप्त केला आहे. इनामगाव येथील बाजार मैदानात विदेशी दारुची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर आणि वडगाव रासाई येथे देशी दारूची विक्री करणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीवर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोन्ही कारवायांमध्ये दारुसाठ्यासह एक इलेक्ट्रिक मोटारसायकल असा एकूण २० हजार ९४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
इनामगावात विदेशी दारुचा साठा जप्त…
२५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास इनामगाव, (ता. शिरुर) येथील बाजार मैदानात ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणी राहुल बाळू मोटे (वय ३२, रा. इनामगाव, ता. शिरुर, जि. पुणे) हा विदेशी दारुचा साठा बेकायदेशीररीत्या जवळ बाळगून ओळखीच्या लोकांना विक्री करताना आढळून आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या कारवाईत दारुच्या बाटल्या आन इलेक्टिकल दुचाकीसह एकूण १६ हजार ७६० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार गवळी हे करत आहेत.
वडगाव रासाईत देशी दारु विक्रीवर कारवाई…
दुसरी कारवाई वडगाव रासाई येथे करण्यात आली. दि २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास वडगाव रासाई येथील हॉटेल सृष्टीच्या पाठीमागे, शेजारील भिंतीच्या आडोशाला हि कारवाई करण्यात आली. राजू कुवारे कुमार (वय १९, सध्या रा. वडगाव रासाई, ता. शिरुर, जि. पुणे; मूळ रा. खोझवा, पोस्ट बहादुरिया, ता. जि. बहराइच) हा तरुण देशी दारुचा साठा बेकायदेशीररीत्या जवळ बाळगून ओळखीच्या लोकांना विक्री करताना आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून एकुण ४ हजार १८० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक कदम हे करत आहेत.
अवैध दारु विक्रीला आळा घालण्याचे आव्हान…
शिरुर तालुक्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या या कारवायांमुळे अवैध दारु विक्रीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. बाजार मैदानासारख्या सार्वजनिक ठिकाणी तसेच हॉटेलच्या पाठीमागील आडोशाला दारुसाठा ठेवून विक्री होत असल्याचे या कारवायांतून समोर आले आहे.
अवैध दारुविक्री आणि साठवणुकीविरोधात पोलिसांकडून कारवाई होत असली, तरी अशा प्रकारांना कायमस्वरुपी आळा घालण्यासाठी नियमित गस्त, संशयित ठिकाणांवर लक्ष आणि विक्रीच्या साखळीपर्यंत पोहोचणारी तपास यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे शिरुर पोलिसांकडून पुढील काळातही अशा अवैध धंद्यांविरुद्ध सातत्याने कठोर कारवाई व्हावी अशी सर्वसामान्य नागरिकांनी मागणी केली आहे.
दारू प्यायची आहे…? चला किराणा दुकानात! शिरूर पोलिसांच्या हद्दीत गावठी दारूची खुलेआम विक्री…
शिरूर तालुक्यात अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; एका गावात हातभट्टी उध्वस्त तर दुसरीकडे गुटखा जप्त…
सिस-पे आर्थिक फसवणूक प्रकरणात शिरूरच्या तलाठ्याला अटक; २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…
शिरूर गोळ्यांच्या आवाजाने हादरतोय; पाच घटनांमध्ये तिघांचा मृत्यू, एकाचा गंभीर मारहाणीत बळी…
मोदी-शाह यांनी काँग्रेस नेत्यांबद्दल वापरलेल्या भाषेची आठवण करून देत सपकाळांचा भाजपावर निशाणा मुंबई: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार; हरसूलमध्ये १० हजार कुटुंबांना दिवाळी शिधावाटप नाशिक: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून सक्तीने…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रशासनाला इशारा; नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीचाही घेतला आढावा नाशिक : राज्यातील दुष्काळी…
गंगापूर रस्त्याचे भूमिपूजन; अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन वसतिगृहाचे उद्घाटन नाशिक: पायाभूत सुविधा आणि शिक्षण क्षेत्रातील विकासकामांच्या माध्यमातून…
न्हावरे (अक्षय टेमगिरे) : एका गैरसमजातून झालेल्या वादातून तरुणाला लाकडी काठीने मारहाण करुन जखमी केल्याची…
न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील आंबळे येथे विवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह…