क्राईम

कवठे येमाई येथे उसाच्या शेतात सापडला मृतदेह; खुन झाल्याचा संशय

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील गांजेवाडी, गणेशनगर परीसरात बुधवारी (दि.२०) सकाळी उसाच्या शेतात एक धक्कादायक घटना उघडकीस आली. फाकटे (ता. शिरूर) येथील देवराम नानाभाऊ टेके (वय अंदाजे ५०) यांचा मृतदेह आढळून आला असून त्यांच्या मृत्यूमागे खूनाचा संशय व्यक्त केला जात आहे. हा खुण झाला असेल तर तो कोणत्या कारणामुळे व का करण्यात आला याचा शोध शिरूर पोलिस करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टेके मंगळवारी (दि.१९) सकाळी नऊ वाजता घराबाहेर पडले होते. नातेवाईकांच्या मते सकाळी पावणेदहा वाजेपर्यंत त्यांचा फोन सुरू होता; मात्र त्यानंतर फोन बंद झाला. दिवसभर ते घरी परतले नाहीत किंवा संपर्कही झाला नाही. त्यामुळे मुलांनी व नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला.

दरम्यान, फाकटे येथील एका युवकाने मंगळवारी टेके यांना गणेश नगर–गांजेवाडी रस्त्याने जाताना पाहिल्याचे सांगितले. बुधवारी सकाळी नातेवाईकांनी त्या रस्त्याने जात शोध घेतला असता कवठे येमाई येथील गांजेवाडी रोडवरील पोल्ट्री शेजारी त्यांची दुचाकी सापडली. त्यानंतर दुचाकीपासून अर्धा किलोमीटर अंतरावर ऊसाच्या शेताच्या कडेला त्यांचा मृतदेह आढळून आला.

मृतदेहाच्या डोक्याला व मानेजवळ गंभीर जखमा असून प्राथमिक पाहणीत खूनाचा संशय व्यक्त होत आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शिरूर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच शिरूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कारंडे, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास वेगाने सुरू आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली असून या मयताबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

13 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

13 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

13 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

14 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

14 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

17 तास ago