सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागणीला प्रशासनाची ग्वाही
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील वाढत्या वाहतूक कोंडी आणि तहसिल कार्यालया समोरील रस्त्यावर अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. सामाजिक कार्यकर्ते निलेश मंदा यशवंत वाळुंज यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देत शिरूर नगरपरिषद व संबंधित विभागीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तातडीच्या कामांसाठी ग्वाही दिली.
तहसील कार्यालयासमोरील पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील धोकादायक ठिकाणी वाहतूक सुरक्षेसाठी खालील उपाययोजना करण्यात येणार आहेत. दुभाजक उभारणी बाबत निविदा प्रक्रिया दोन ते तीन दिवसांत सुरू होणार असून, कार्यारंभ आदेशानंतर पुढील दीड महिन्यात काम पूर्ण होईल.
दिशादर्शक फलक बाबत आठ ते दहा दिवसांत तयार होतील व दुभाजक उभारणीनंतर त्वरित बसवले जातील.सिग्नल दिवे बसवण्याबाबत दुभाजकाच्या कामासोबतच उभारले जातील. शास्त्रीय गतिरोधक पावसाची उसंत मिळताच बसवले जाणार आहे.झेब्रा क्रॉसिंग तहसील व पंचायत समिती चौकात पावसानंतर करण्यात येईल.स्वच्छता व झाडांची छाटणी दोन दिवसांत पूर्ण होऊन दुभाजक बसवेपर्यंत तात्पुरत्या उपाययोजना सुरू राहतील.
शिरूर नगरपरीषदेचे बांधकाम अभियंता समाधान मुंगसे आणि कंत्राटी अभियंता सागर बडगुजर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून ही माहिती दिली.पाहणीवेळी ग्राहक पंचायतचे तालुका अध्यक्ष अरुणकुमार मोटे, सा.बां. विभागाचे गाडेकर, शिरूर पोलीस ठाण्याचे अमोल गारुडी आदी मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते वाळुंज यांनी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांची स्वतंत्र भेट घेऊन कामांच्या प्रगतीबाबत चर्चा केली. तहसीलदारांनी यापूर्वीच नगरपरिषदेला पत्रव्यवहार करून आवश्यक सूचना दिल्याचे सांगून, पुन्हा एकदा अधिकाऱ्यांशी बोलून कामे तातडीने मार्गी लावली जातील, अशी ग्वाही दिली.शिरूरकरांसाठी ही सकारात्मक घडामोड ठरणार असून लवकरच शहरातील वाहतूक सुरक्षेत लक्षणीय सुधारणा दिसून येणार आहे.
बऱ्याच दिवसांपासून या विषयावर पाठपुरावा सुरू होता. तहसीलदार, गटविकास अधिकारी व पोलिस निरीक्षक यांनीही नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नगरपालिकेला पत्रव्यवहार केला होता. आता अधिकारींनी दिलेली आश्वासने वेळेत, दर्जेदार व शास्त्रीय पद्धतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. जनहितासाठी या कामांवर सातत्याने लक्ष ठेवणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे.
निलेश मंदा यशवंत वाळुंज (सामाजिक कार्यकर्ते/व्हिसल ब्लोअर)
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…