क्राईम

हुंड्यासाठी लग्नाच्या 12 दिवसात नववधूला विष पाजलं; विवाहितेचा मृत्यू

नांदेड: नांदेडमध्ये एका नवविवाहितेचा हुंड्यासाठी बळी गेला. ताऊबाई चव्हाण नावाच्या एका महिलेला तिच्या सासरच्या लोकांनी विष देऊन मारल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत पतीसह सासू-सासऱ्याला अटक केली आहे. लग्नाच्या अवघ्या काही दिवसातच ही धक्कादायक घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हुंड्यात सांगितलेली रक्कम दिली नसल्याने विवाहितेला संपवलं

मुखेड तालुक्यातील वसुर तांडा येथील ताऊबाईचा विवाह २ जुलै रोजी राठोडवाडीच्या सुधाकर राठोडसोबत झाला होता. लग्नात हुंडा म्हणून ठरलेली रक्कम पूर्ण न दिल्याने सासरच्या लोकांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली, असा आरोप आहे. ताऊबाईच्या माहेरच्या लोकांनी सांगितलं की, लग्नाच्या वेळी ६ लाख रुपये हुंडा देण्याचं ठरलं होतं. त्यांनी ५ लाख रुपये दिले सुद्धा. मात्र, उर्वरित १ लाख रुपयांसाठी ताऊबाईला विष पाजण्यात आलं.

९ जुलै रोजी ताऊबाईला उलट्या होऊ लागल्या. तिला आधी मुखेडमध्ये आणि नंतर हैदराबादमध्ये उपचारासाठी दाखल केलं. परंतु, १३ जुलै रोजी तिचा मृत्यू झाला.

हुंड्यात कमी दिलेल्या १ लाखासाठी लेकीला मारलं, कुटुंबियांचा आरोप

ताऊबाईच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितलं की, हुंड्यासाठीच तिला विष देऊन मारण्यात आलं. या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत ताऊबाईचा पती, सासू आणि सासरे अशा तिघांना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक अविनाशकुमार यांनी सांगितलं की, विवाहितेला विष पाजन्यात आलं? का तिने स्वतः विष प्राशन केलं याचा तपास सुरु आहे.

ताऊबाईच्या वडिलांनी कर्ज काढून तिच्या लग्नासाठी पैसे जमा केले होते. मात्र, केवळ एका लाख रुपयांसाठी तिच्या सासरच्या लोकांनी तिचा जीव घेतला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून परिसरात शोक व्यक्त होत आहे. वडिलाने नातेवाईकांकडून हात उसने पैसे घेऊन लेकीचा विवाह केला होता. मात्र एक लाखासाठी सासरच्या मंडळींनी तिचा खून केला असल्याचं ताऊबाईच्या नातेवाईकांनी सांगितलं.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

10 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

10 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

10 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

10 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

10 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

10 तास ago