महाराष्ट्र

तुम्ही मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्याला अडवल का नाही

मुंबई: विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर बुधवारी (दि. १६ जुलै ) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळखर यांच्यात उडालेल्या शाब्दिक चकमकीचे तीव्र पडसाद गुरूवारी (दि. १७ ) उमटले.

आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख आणि पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले यांच्यात शिवीगाळ झाली आणि त्यानंतर दोन्हीकडील कार्यकर्त्यांमध्ये प्रवेशद्वाराजवळील लॉबीत तुंबळ हाणामारी झाली.

आता काही व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यात पडळकर हे नितीन देशमुख यांच्याकडे पाहून कार्यकर्त्यांना निर्देश देताना दिसल्याचे दिसत आहेत. त्यामुळे पडळकर यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. याबद्दल पडळकर यांना प्रश्न विचारला आहे. ते विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

नितीन देशमुख यांना खुणवून कार्यकर्त्यांना मारायचे आदेश दिले, असा आरोप आव्हाड यांनी केला आहे. याबद्दल विचारल्यावर पडळकर म्हणाले, “नितीन देशमुख हा माझ्या ओळखीचा कार्यकर्ता नाही. माझी लक्षवेधी होती. पण, मंत्री उपस्थित नसल्याने मी निघालो होतो. तेव्हा, तो प्रसंग घडला. मला अजिबात काही बोलायंच नाही.”

“माझी भूमिका व्यक्त केली आहे. अध्यक्षांकडे जाऊन दिलगिरी व्यक्त केली आहे. माझ्या सहकाऱ्यांकडून चूक झाली आहे. तुम्ही कारवाई करावी. त्यामुळे अध्यक्षांच्या अधिकारातील हा कट आहे. संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. शेवटी कायदा सर्वश्रेष्ठ आहे. विधानसभा अध्यक्ष आणि सभापतींनी घेतलेली भूमिका त्यावर आमचं कुठलेही मत नाही. आम्ही कायद्याला मानणारे आहोत. जी कारवाई झाली, त्याला कोर्टात सामोरे जाऊ,” असे पडळकर यांनी सांगितलं.

तुम्ही मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांना अडवायला का गेला नाही? असा प्रश्न विचारल्यावर पडळकर यांनी काढता पाय घेण्याा प्रयत्न केला. ‘ठीक आहे..’ एवढंच म्हणत पडळकर यांनी हिंदीत बाईट देण्यास सुरूवात केली. तसेच, पडळकर हे विधिमंडळात निघून गेले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

4 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

4 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

4 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

4 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

4 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

4 तास ago