क्राईम

सणसवाडीत कोयत्याचा धाक दाखवत खंडणीची मागणी

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर)) येथील एका युवकावर निवडणुकीच्या वादातून हाणामारी केल्याबाबतचे गुन्हे दाखल झाल्यानंतर त्याच व्यक्तीने एका व्यक्तीच्या मागे कोयता घेऊन पळून खंडणी मागितल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गणेश उर्फ बन्सी बबन दरेकर याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथील गणेश बन्सी दरेकर या युवकाने निवडणुकीच्या वादातून काळूराम दरेकर या युवकाला मारहाण केल्याची घटना (दि. ९) ऑक्टोबर रोजी घडली. त्याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले मात्र त्याच रात्री गणेश दरेकर याने विकास दरेकर या इसमाच्या मागे कोयता घेऊन येत त्याला रस्त्यात अडवून त्याच्याकडे 5 हजार रुपयाची मागणी केली.

यावेळी कोयता पाहून विकास पळू लागला असता कोयता घेऊन त्याच्या मागे पळत मला 5 हजार रुपये दे नाहीतर मी तुला मारूनच टाकतो अशी धमकी दिली यावेळी विकास दरेकर हे एका घरात लपले असता मी इथला भाई आहे असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी केली याबाबत विकास महादू दरेकर (वय ३६) रा. खंडोबाची आळी सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी गणेश उर्फ बन्सी बबन दरेकर रा. सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

3 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

17 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

23 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

24 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago