शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील मलठणच्या शिंदेवाडी, वरुडे आणि निमगाव दुडे येथील आठ कुटुंबांनी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नैताळे गावातील चार कॉन्ट्रॅक्टर्सकडून तब्बल ५५.९१ लाखांची फसवणूक झाल्याची गंभीर तक्रार शिरूर पोलीस ठाण्यात केली आहे.
तक्रारदारांच्या माहितीनुसार, वैजनाथ मोहिते, अजय पवार, नामदेव पवार आणि मोहन चव्हाण या चौघांनी गावात आठ ते नऊ महिने वास्तव्य करून घरबांधणीची कामे सुरू केली होती. गावकऱ्यांचा विश्वास संपादन करून त्यांनी अनेक घरांची कामे घेतली. सुरुवातीला बांधकाम सुरू करून नंतर कामे अर्धवट ठेवून सर्व आरोपी गाव सोडून निघून गेले.
या कामांसाठी रोख व ऑनलाइन स्वरूपात लाखो रुपयांची रक्कम आरोपींकडे दिली होती. यामध्ये भानुदास थोरात यांच्याकडून सर्वाधिक १३.५० लाख, खंडू शिंगाडे यांच्याकडून १३ लाख, म्हस्कू थोरात यांच्याकडून १२.१० लाख, तर अभिमन्यू बारहाते, मंगल पानगे, शंकर शिंदे, मंगल शिंगाडे आणि मंगेश फुलसुंदर यांच्याकडून अनुक्रमे लाखो रुपयांची रक्कम घेण्यात आली होती.
अर्जदार मंगेश फुलसुंदर यांच्याकडून बांधकाम साहित्यदेखील घेतले गेले होते. तसेच अर्जदार भानुदास थोरात हे आरोपींच्या मूळ गावी नैताळे (जि. नाशिक) येथे गेले असता, त्यांना धमकावण्यात आले आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
तक्रारीनुसार, (दि. ३१) मार्च २०२५ रोजी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली, मात्र अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे दि. ४ एप्रिल रोजी पुन्हा अर्ज सादर करून सर्व आरोपींवर फसवणूक व जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारदारांनी घराच्या अर्धवट बांधकामाचे फोटो, बँक स्टेटमेंट व ऑनलाइन व्यवहाराचे पुरावेही पोलिसांना सादर केले आहेत. घर बांधणी कामासाठी विश्वास संपादन करून काम अर्धवट ठेवून लाखो रुपये जमा करून पळून जाणाऱ्या ठेकेदारावर त्वरीत कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…