क्राईम

अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; तिघे ताब्यात, शहरात संतापाची लाट

नागपूर : शहरातील नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघा आरोपींना ताब्यात घेतले असून त्यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता अकरावीमध्ये शिक्षण घेणारी विद्यार्थिनी आहे. मुख्य आरोपी बारावीचा विद्यार्थी असून दोघांचा पूर्वीपासून परिचय होता. आरोपीने यापूर्वी तिच्याशी अश्लील वर्तन केल्याने ती त्याला टाळत होती. मात्र सतत येणाऱ्या संदेशांमुळे तिने अखेर त्याच्याशी बोलण्यास होकार दिला.

५ फेब्रुवारी रोजी आरोपीने तिला घरी भेटण्यासाठी बोलावले. घरात इतर सदस्य असतील, असा समज करून ती त्याच्याकडे गेली. मात्र प्रत्यक्षात घरात आरोपीसह त्याचे दोन अल्पवयीन मित्र उपस्थित होते. बोलण्याच्या बहाण्याने आरोपीने तिला एका खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. बाहेर असलेल्या दोघांनी मोबाईलवर व्हिडिओ बनविल्याची धमकी देत तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची भीती दाखवली. या धमकीच्या जोरावर त्यांनीही तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या घटनेमुळे पीडिता मानसिकदृष्ट्या हादरली होती. अखेर तिने धैर्य एकवटून कुटुंबीयांना संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर नंदनवन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी त्वरित गुन्हा नोंदवून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

मुख्य आरोपीचा बारावीचा पहिला पेपर मंगळवारी होता. मात्र तो पोलिस कोठडीत असल्याने परीक्षेला बसू शकला नाही. दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर आरोपीच्या वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याची माहिती समोर आली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, नागपूरमध्ये या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलिसांनी तपास वेगाने सुरू ठेवत पीडितेला आवश्यक मदत व संरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

2 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

16 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

22 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

23 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

23 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

23 तास ago