शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर (ता. शिरुर) येथील सुरज नगर मध्ये राहणाऱ्या युवकाला चक्क एका महिलेने नोकरीच्या आमिषाने 10 लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे अरुधंती जयदीप तांबवेकर या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरुर येथील सुरजनगर मध्ये राहणारा नवनाथ सालके हा युवक शिक्षणानंतर नोकरीच्या शोधात असताना काही दिवसांपूर्वी नवनाथ च्या कुटुंबियांची पुण्यातील अरुधंती तांबवेकर या महिलेशी ओळख झाली त्यांनतर सदर महिलेने त्याला माझी रेल्वे विभागात ओळख आहे. तुला चांगल्या नोकरीला लावते. त्यासाठी काही पैसे खर्च करावे लागतील सांगितले. त्यामुळे नवनाथचे वडील रघुनाथ यांनी सदर महिलेला रोख तसेच बँकेच्या खात्यात टाकून 10 लाख रुपये दिले. मात्र त्यानंतर अनेक दिवस सदर महिलेने नोकरी लागेल थांबा, असे म्हणून काही दिवस घालवले.
मात्र त्यानंतर सालके यांचे फोन उचलणे देखील बंद केले व त्यांना काही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने, रघुनाथ नाना सालके (वय ४८) रा. सुरजनगर शिरुर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी याबाबत शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलिसांनी अरुधंती जयदीप तांबवेकर रा. पुणे या महिलेवर फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक सुजाता पाटील या करत आहे.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…