शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर (ता. शिरुर) येथील पाचकंदील चौक परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीनी प्रवेश करत घरातील साडेतीन तोळे सोन्याचे वजनाचे दागिन्यांसह दोन मोबाईल व एक दुचाकी अज्ञात चोरट्यांनी पळवल्याची घटना घडल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शिरुर (ता. शिरुर) येथील पाचकंदील चौक परिसरात राहणारे श्रीहरी मेंदरकर हे पहाटेच्या सुमारात झोपलेले असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराच्या गॅलरीतून घरात प्रवेश करुन घरातील साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, दोन मोबाईल तसेच घराबाहेर पार्किंग मध्ये लावलेली दुचाकी घेऊन पोबारा केला.
सकाळच्या सुमारास सदर प्रकार उघडकीस आल्याने श्रीहरी विठ्ठल मेंदरकर (वय ५६) रा. पाचकंदील चौक शिरुर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी याबाबत शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलिसांनी अज्ञात इसमांवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार हे करत आहे.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…