क्राईम

शिरुर तालुक्यात हत्यारांच्या धाकाने दोन कुटुंबांना लुटले

शिक्रापूर (शेरखान शेख): कोंढापुरी (ता. शिरुर) येथे 2 घरात रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घुसून तिघा अज्ञात चोरट्यांनी हत्यारांचा धाक दाखवून घरातील दागिने व रोख रक्कम लुटून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे 3 अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कोंढापुरी (ता. शिरुर) येथील कवठीमळा येथे राहणारे संतोष जगताप हे कुटुंबियांसह घरात झोपेले असताना रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास 3 अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजावर काहीतरी मारुन दरवाजातून आतमध्ये आले. त्यांनी जगताप यांच्यासह त्यांच्या पत्नीला कोयत्याचा धाक दाखवत पत्नीच्या अंगावरील तसेच कपाटातील सोन्या चांदीचे दागिने व कपाटातील 50 हजार रुपये आणि दोघांचे मोबाईल काढून घेत दोघांना दमदाटी करत घरातून बाहेर जात घराला बाहेरुन कडी लावून घेतली.

याचवेळी जगताप यांच्या शेजारी राहणाऱ्या गणेश घरत यांच्या घराचा देखील दरवाजा उघडून गणेश व त्यांच्या आईला कोयत्याचा धाक दाखवत त्यांच्या कपाटातील सोन्या चांदीचे दागिने व 10 हजार रुपये रोख रक्कम काढून तिघांनी तब्बल 3 लाखांचा ऐवज लुटून तेथून पोबारा केला. घडलेल्या घटनेबाबत संतोष उत्तरेश्वर जगताप (वय ३७) कवठीमळा कोंढापुरी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी 3 अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे व पोलीस नाईक रोहिदास पारखे हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

20 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

20 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

20 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago