क्राईम

टाकळी भिमात जुन्या वादातून युवकाला मारहाण; गुन्हा दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): टाकळी भीमा (ता. शिरुर) येथे एका युवकाला जुन्या वादातून दारु पिऊन शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केल्याच्या घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे संतोष लोकरे या युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

टाकळी भीमा (ता. शिरुर) येथील आकाश मोहिते व संतोष लोकरे यांचे यापूर्वी वाद झालेले आहेत. आकाश हा त्याच्या घरासमोरुन जात असताना संतोष तेथे दारु पिऊन आला त्याने जुन्या वादातून आकाशला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी आकाश प्रतिकार करत असताना संतोषने त्याच्या हाताला चावा घेत जखमी केले.

याबाबत आकाश मारुती मोहिते (वय २१) रा. टाकळी भीमा (ता. शिरुर) जि. पूणे याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी संतोष लोकरे रा. टाकळी भीमा (ता. शिरुर) जि. पूणे याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अमोल चव्हाण हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

12 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

16 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

16 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

16 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

16 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

17 तास ago