शिरूर तालुका

शिरुर तालुक्यातील बहिणीने केली भाऊबिजेला भावाला किडनी दान…

शिक्रापूर (शेरखान शेख): बहिण भावाच्या नात्याचा पवित्र सन म्हणजे भाऊबीज या दिवशी प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीला तसेच बहिण आपल्या भावाला काही भेट देत असते. मात्र शिरुर तालुक्यातील एका बहिणीने भाऊबिजेच्या दिवशी आपल्या लहान भावाला चक्क किडनी दान देत भावाला भाऊबीजेच्या निमित्ताने नवजीवनाची भेट दिली आहे.

करंदी (ता. शिरुर) येथील बाळासाहेब ढोकले यांना कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोनाची लागण झाली, त्यावेळी उपचार सुरु असताना त्यांना शुगर व बिपीचा त्रास होऊ लागला त्यांनतर कोरोना तून बरे झाल्यानंतर देखील त्यांना वेगवेगळा त्रास होऊ लागल्याने त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र नेहमी वेगवेगळा त्रास होत असल्याने त्यांची पुणे येथे तपासणी केली असता बाळासाहेब ढोकले यांची एक किडनी निकामी झाल्याचे मे २०२२ मध्ये समोर आले.

दरम्यान त्यांच्यावर काही उपचार करत डायलेसीस करण्यात आले. मात्र किडनी निकामी असल्याने संपूर्ण कुटुंब हैराण झालेले असताना चेन्नई येथील कोहीमतूर येथे किडनीबाबतचे खात्रीशीर उपचार केले जात असल्याची माहिती त्यांच्या एका नातेवाईकाने दिली, तर बाळासाहेब यांची मोठी बहिण रंजना विजापूरकर हिने मी भावासाठी किडनी दान करणार असल्याचे सांगितले.

त्यावेळी बाळसाहेब ढोकले यांचा मुलगा युवा सेनेचे जिल्हा चिटणीस वैभव ढोकले याने माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या माध्यमातून वडील व आत्यांसह चेन्नई गाठली तेथे दोघा बहिण भावांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी दोघांचे रक्तगट व आदी बाबी समांतर होत असल्याने किडनी प्रत्यारोपण करण्याचे ठरले अन त्याबाबतच्या शस्त्रक्रिया पूर्ण करत किडनी प्रत्यारोपण करण्यात आले असून दोघांनी प्रकृती स्थिर असून बाळसाहेब ढोकले यांची देखील प्रकृती पूर्णपणे बरी झालेली असून लवकरच ते आता शिरुर तालुक्यात येणार असल्याचे युवा सेनेचे युवा सेनेचे जिल्हा चिटणीस वैभव ढोकले यांनी सांगितले.

आढळरावांच्या माध्यमातून निधी उपलब्ध…

बाळासाहेब ढोकले यांच्यावर उपचार करण्यासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळाला असून पुढील काही निधी मिळवण्यासाठी देखील प्रयत्न सुरु असल्याचे जिल्हा चिटणीस वैभव ढोकले यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

19 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

19 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

19 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

19 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

19 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

23 तास ago