शिरूर तालुका

नामावंत तमाशा फडमालक गंगाराम बुवा रेणके (कवठेकर) यांचे निधन

कवठे येमाई: नामावंत तमाशा फडमालक, ढोलकीचा बादशाहा व शासनाचा जीवनगौरव पुरस्कार पटकावलेले गंगाराम बुवा रेणके (कवठेकर) यांचे आज (गुरुवार) पहाटे निधन झाले आहे.

कवठे येमाई येथील गंगाराम बुवा कवठेकर यांनी एकेकाळी राज्यात तमाशा क्षेत्रात नामवंत फडमालक, ज्येष्ठ ढोलकी पटू, लोकगीतकार, लेखक व कवी म्हणून नावारुपाला येवून महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांवर अनेक वर्ष राज्य केले होते. ढोलकीचा बादशहा गंगाराम बुवा कवठेकर-रेणके यांचे यांचे आज (गुरुवार) पहाटे निधन झाले. मृत्यूसमयी ते ९६ वर्षांचे होते. महाराष्ट्र शासनाच्या सर्वोच्च अशा जीवनगौरव पुरस्काराने गंगारामबुवांना सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने समस्त रेणके परिवारासह कवठे येमाई गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्राथमिक शिक्षक राजेंद्र रेणके यांचे ते वडील होत. युवा सामाजिक कार्यकर्ते विशाल (सनी) रेणके, अनिकेत रेणके यांचे ते आजोबा होत.

त्यांच्या निधनाबद्दल माजी गृहमंत्री ना.दिलीपराव वळसे पाटील, शिरुरचे माजी आमदार पोपटराव गावडे, दामुशेठ घोडे, भीमाशंकर साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रदीपदादा वळसे पाटील, शिरूर पंचायत समिती सदस्य डॉ.सुभाष पोकळे, बेल्हा लोकनाट्य राज्यस्तरीय तमाशा महोत्सवाचे अध्यक्ष वसंतराव जगताप, आझाद बोरगावकर, सरपंच सुनीता पोकळे, ग्रामपंचायत सदस्य प्रवीणकुमार बाफणा, वैशाली रत्नपारखी,मधुकर रोकडे, वसंत पडवळ, अभिजित लंघे व अनेक ग्रामस्थांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावचे नाव कलेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवण्याचे काम या कलावंताने केले आहे. अशा या कलावतांला भावपुर्ण श्रद्धांजली.
दिपक रत्नपारखी (मा. सरपंच कवठे येमाई)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आढळरावांनी बाळासाहेबांशी गद्दारी केली, शिवसैनिक त्यांना माफ करणार नाही; सचिन अहिर

वाघोली (प्रतिनिधी) शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मजबूत असुन या दोन्ही तालुक्यात…

1 दिवस ago

इंडिया आघाडी अतिरेक्यांची भाषा बोलू लागली; देवेंद्र फडणवीस

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी शिरुर येथे मंगळवार…

1 दिवस ago

Video; गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवताय, पाबळच्या युवकाने आढळराव यांना पाणी प्रश्नावर घेरलं…

शिरुर (तेजस फडके) 'गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवत आहात. तुम्ही १५ वर्षे खासदार असताना…

1 दिवस ago

शिरुर ग्रामीण मध्ये डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते मैदानात

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शिरुर…

2 दिवस ago

शिरुर तालुक्यात पोलिसांनी छापा टाकत दोन गांजा विक्रेते तसेच गांजा ओढणाऱ्या दोन जणांवर केली कारवाई

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील औ‌द्योगीक वसाहतीमध्ये काही ठिकाणी अवैधरीत्या गांजाची चोरुन…

2 दिवस ago

शिरुर तालुक्यात एका व्यक्तीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील शेतकरी संतोष सुभाष चौधरी यांनी विषारी औषध…

3 दिवस ago