क्राईम

शिरुरमध्ये दरवाजाचे कुलूप तोडून दागिने व रक्कम लंपास

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर शहरातील रामलिंग रोड येथील रुद्रा कॉलनी मधील एका व्यक्तीच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिरुर शहरातील रामलिंग रोड येथील रुद्रा कॉलनी येथे राहणारे विलास घोलप हे घराला कुलूप लावून १६ डिसेंबर २०२२ रोजी गावाला गेलेले होते, ३ जानेवारी रोजी सायंकाळ च्या सुमारास घोलप गे गावाहून घरी आले असता त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले असल्याचे आणि कपाट उघडे व घरातील साहित्य अस्थाव्यस्थ पडलेले असल्याचे घोलप यांना दिसून आले. यावेळी घोलप यांनी घरातील कपाटाची पाहणी केली असता कपाटातील दीड तोळा वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख 3 हजार रुपये असा ऐवज चोरीला गेला असल्याचे घोलप यांना दिसले.

याबाबत विलास मोतीराम घोलप (वय ४०) रा. शिरुर रामलिंग रोड रुद्रा कॉलनी, साई नगर ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. जवळगा ता. निलंगा जि. लातूर यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्रीनाथ जगताप हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

9 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

13 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

13 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

13 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

13 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

14 तास ago