मुख्य बातम्या

शिरूर! करडे गोळीबार प्रकरणातील पाच आरोपी ७२ तासांत जेरबंद; पाहा नावे…

शिरूर (तेजस फडके) : करडे (ता. शिरुर) येथे जुन्या वादातून सराईत गुन्हेगारावर पिस्तुलातून तीन राउंड फायर करुन जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच आरोपींना शिरुर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या ७२ तासांच्या आत अहिल्यानगर जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. सुपा (ता. पारनेर) बसस्थानक परिसरात सापळा रचून करण्यात आलेल्या या कारवाईत शिरुर पोलिसांच्या डीबी पथकाने दमदार कामगिरी केली आहे.

शिरूर तालुक्यातील करडे गावच्या हद्दीत हनुमान मंदिराच्या पाठीमागे, भैरवनाथ मंदिराजवळील स्मशानभूमीशेजारी असलेल्या तळ्याजवळ १८ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे १:३० वाजता हि घटना घडली होती. आरोपी आदित्य लंघे, बबलू सोनलकर, टिन्या शेळके, दाद्या उर्फ रोहन पंचमुख व अन्य तीन ते चार जणांनी बेकायदा जमाव जमवून फिर्यादी निखिल सतीश थेऊरकर (वय २३, रा. करडे, दौडे वस्ती) याला शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या दिशेने पिस्तुलातून तीन राउंड फायर करण्यात आले.

याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच शस्त्र अधिनियम कलमाच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी तातडीने स्वतंत्र तपास पथके तयार केली. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरु करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांना आरोपी सुपा बसस्थानकावर येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलिस हवालदार अक्षय कळमकर, पोलिस अंमलदार विजय शिंदे, नितेश थोरात, निरज पिसाळ आणि सचिन भोई यांच्या पथकाने सापळा रचला.

या कारवाईत अथर्व उर्फ टिन्या रावसाहेब शेळके (वय १९), रोहन उर्फ दाद्या पंचमुख (वय १९, दोघेही (रा. रांजणगाव गणपती), आदित्य दशरथ लंघे (वय १९, रा. करडे) निखिल विलास कायस्थ (वय १९) आणि सनी परमेश्वर मस्के (वय २०) दोघेही (रा. कारेगाव) यांना शिताफीने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. या गुन्ह्यात दोन विधीसंघर्षित बालकांचाही सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींना आज (ता. २१) पोलिस कोठडीसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

अथर्व उर्फ टिन्या शेळके आणि रोहन उर्फ दाद्या पंचमुख हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याविरुद्ध रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात खंडणी, अवैध हत्यार बाळगणे, बेकायदा जमाव आणि मारहाणीचे एकूण पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. फिर्यादी निखिल थेऊरकर याच्या विरुद्धही शिरुर, रांजणगाव एमआयडीसी आणि परभणी पोलिस ठाण्यांत खून, खुनाचा प्रयत्न, अवैध अग्निशस्त्र आणि गंभीर मारहाणीचे पाच गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पुर्वीच्या मारहाणीच्या रागातून गोळीबार झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलिस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र भोसले आणि पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, राकेश मुळीक, पोलिस हवालदार अक्षय कळमकर, शरद वारे, राहुल भवर तसेच पोलिस अंमलदार विजय शिंदे, नितेश थोरात, निरज पिसाळ, सचिन भोई, निखिल रावडे, अंबादास थोरे, रविंद्र काळे, अजय पाटील आणि दादाराव नागरे यांच्या पथकाने केली. या घटनेचा पुढील अधिक तपास शिरुरचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील हे करत आहेत.

शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिड महिन्यात दुसऱ्यांदा गोळीबार; पोलिसांचा धाक संपलाय का…?

शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार

शिरूरच्या करडे घाटात गोळीबार, विशाल काळेसोबत नेमकं काय घडलं…

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

Video! शिरूर तालुक्यातील सविंदणे गावात हवेत गोळीबार; गुन्हा दाखल…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

3 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

3 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

3 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

3 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

3 तास ago

अजित पवारांच्या अपघाताचे राजकारण करू नका; सुनेत्रा पवारांचा विरोधकांना इशारा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी अजित पवारांच्या अपघाताच्या मुद्द्यावरून…

5 तास ago