जुन्या वादातून हल्ल्याचा संशय; छाती, पोट आणि हातावर सपासप वार, प्रकृती गंभीर; हल्लेखोरांचा शोध सुरू
आष्टी: गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान १८ वर्षीय तरुणाला बाजूला बोलावून धारदार चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री कडा येथे घडली. या हल्ल्यात रेहान अन्वर शेख (वय १८, रा. कडा) हा गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, कडा येथील एका गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक गुरुवारी सायंकाळी ग्रामपंचायत कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे राम मंदिराच्या दिशेने निघाली होती. रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास मिरवणुकीत सहभागी असलेल्या रेहान शेख याला तीन ते चार तरुणांनी काहीतरी बोलायचे असल्याचे सांगून बाजूला बोलावले.
रेहानला शहरातील जुन्या बारवाजवळ नेल्यानंतर संशयितांनी कमरेला लपवलेले धारदार चाकू बाहेर काढले आणि त्याच्या छाती, पोट व हातावर वार केले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे रेहान गंभीर जखमी होऊन खाली कोसळला. घटनेनंतर परिसरात गोंधळ उडाला. या संधीचा फायदा घेत संशयित हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.
रक्तस्त्राव अधिक; अहिल्यानगरला हलवले
हल्ल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी जखमी रेहानला तातडीने कडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, गंभीर दुखापत आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने प्रथमोपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी रात्रीच अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
जुन्या वादातून हल्ल्याचा संशय
घटनेची माहिती मिळताच कडा पोलीस चौकी आणि आष्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. पसार झालेल्या संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
सध्या सर्वांना भेडसवणार एकच प्रश्न म्हणजे वजन कमीच होत नाही. अनेक जण वजन कमी करण्यासाठी…
रात्रीच्या जेवणानंतर आपल्यापैकी बऱ्याचजणांना गोड पदार्थ खाण्याचे क्रेविंग्स होतात. अशावेळी या गोड पदार्थांचे क्रेविंग्स भागवण्यासाठी…
नवी दिल्ली : विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याभोवती सुरू…
मुंबई : घरातील इलेक्ट्रिक मीटर म्हणजे केवळ किती युनिट वीज वापरली याची नोंद करणारे उपकरण…
काका राधाकृष्ण विखे पाटलांपासून दशकभर संपर्क नसल्याचा दावा अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या विखे पाटील कुटुंबातील नीला…
मुंबई : ‘वेलकम’, ‘गदर’, ‘आशिकी’, ‘मुझसे शादी करोगी’ आणि ‘हम हैं राही प्यार के’ यांसारख्या…