महाराष्ट्र

SIR वादावर NDAमध्येही मतभेद? कुशवाहांचा निवडणूक आयोगाला सवाल

नवी दिल्ली : विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याभोवती सुरू असलेल्या वादावर आता सत्ताधारी NDAमधील घटकपक्षांकडूनही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्यानंतर राष्ट्रीय लोक मोर्चाचे नेते आणि राज्यसभा खासदार उपेंद्र कुशवाह यांनीही SIR संदर्भातील संभ्रम तातडीने दूर करण्याची मागणी केली आहे.

कुशवाह यांनी म्हटले आहे की, SIRच्या वादामुळे जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. हा संशय दूर होणे आवश्यक असून निवडणूक आयोगाने तातडीने वस्तुस्थिती स्पष्ट करावी. त्यांची ही भूमिका NDAच्या घटक पक्षातील नेत्याकडून आलेली असल्याने राजकीय वर्तुळात त्याची चर्चा सुरू झाली आहे.

आधी भूमिका सावध, आता थेट स्पष्टीकरणाची मागणी

पाटणा येथे माध्यमांनी कुशवाह यांना निवडणूक आयोगातील कथित मतभेदांबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनी हा निवडणूक आयोगाचा अंतर्गत विषय असल्याचे सांगत त्यावर भाष्य करण्यास टाळले होते. दोन व्यक्तींमध्ये मतभेद होणे ही असामान्य बाब नसल्याचेही त्यांनी म्हटले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर भूमिका मांडत SIR संदर्भातील जनतेचा संभ्रम दूर करण्यासाठी आयोगाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली.

कुशवाह यांच्यापूर्वी केंद्रीय मंत्री आणि NDAचे घटकपक्ष नेते चिराग पासवान यांनीही जनतेच्या मनातील प्रश्न आणि शंका दूर होणे आवश्यक असल्याचे म्हटले होते. सरकारचा भाग असल्याने घटनात्मक संस्थेचा बचाव करण्याची भूमिका घेणार नसल्याचे सांगत त्यांनी या मुद्द्यावर सावध भूमिका घेतली होती.

१४ वेळा आक्षेप नोंदवल्याचा दावा

दरम्यान निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या दहा महिन्यांत आयोगाच्या निर्णयांवर किमान १४ वेळा लेखी आक्षेप नोंदवले. हे आक्षेप मतदार नोंदणी, मतदारांची नावे वगळणे-समाविष्ट करणे, Form-6 मधील बदल तसेच मतदार यादीच्या डेटाबेसच्या व्यवस्थापनासारख्या मुद्द्यांशी संबंधित असल्याचे अहवालात म्हटले आहे.

मात्र निवडणूक आयोगाने भूमिका स्पष्ट करताना अंतर्गत चर्चा, निरीक्षणे आणि तांत्रिक सूचना या संस्थेच्या निर्णयप्रक्रियेतील नियमित भाग असल्याचे म्हटले आहे. आयोगाने अंतिम निर्णय कायदेशीर प्रक्रिया आणि आवश्यक मंजुरीनुसार घेतले जात असल्याचेही स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर आता NDAतीलच काही नेत्यांकडून जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्याची मागणी होत असल्याने SIR चा वाद आणखी चर्चेत आला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कमी खाऊनही वाढतंय तुमचं वजन, या 5 सवयी ठरु शकतील जबाबदार

सध्या सर्वांना भेडसवणार एकच प्रश्न म्हणजे वजन कमीच होत नाही. अनेक जण वजन कमी करण्यासाठी…

30 मिनिटे ago

रात्रीच्या जेवणानंतर इवलिशी वेलची चावून खा! एक नाही अनेक गुणकारी फायदे

रात्रीच्या जेवणानंतर आपल्यापैकी बऱ्याचजणांना गोड पदार्थ खाण्याचे क्रेविंग्स होतात. अशावेळी या गोड पदार्थांचे क्रेविंग्स भागवण्यासाठी…

38 मिनिटे ago

कडा हादरले! गणेश विसर्जन मिरवणुकीत १८ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला

जुन्या वादातून हल्ल्याचा संशय; छाती, पोट आणि हातावर सपासप वार, प्रकृती गंभीर; हल्लेखोरांचा शोध सुरू…

52 मिनिटे ago

मीटरवरील ‘हा’ लाल दिवा देतोय मोठा संकेत! वीजबिल वाढण्याआधीच कळू शकते कारण

मुंबई : घरातील इलेक्ट्रिक मीटर म्हणजे केवळ किती युनिट वीज वापरली याची नोंद करणारे उपकरण…

56 मिनिटे ago

विखे कुटुंबातील नीला विखे पाटील स्वीडनच्या संसदेत

काका राधाकृष्ण विखे पाटलांपासून दशकभर संपर्क नसल्याचा दावा अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या विखे पाटील कुटुंबातील नीला…

1 तास ago

वेलकम’ फेम अभिनेता मुश्ताक खान यांचे निधन; कॅन्सरशी झुंज अखेर अपयशी

मुंबई : ‘वेलकम’, ‘गदर’, ‘आशिकी’, ‘मुझसे शादी करोगी’ आणि ‘हम हैं राही प्यार के’ यांसारख्या…

2 तास ago