क्राईम

लोणी काळभोरमध्ये वैवाहिक आणि मानसिक छळ प्रकरण; पतीसह १० जणांविरोधात गुन्हा

पुणे: लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एका पिडीत महिलेकडून पतीसह दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, पिडीत पत्नीच्या वैध विवाहाचे कायदेशीर नाते अस्तित्वात असताना पती सिद्धेश्वर नामदेव काळभोर यांनी जाणीवपूर्वक दुसऱ्या महिलेशी, पुनम बाबुराव गायकवाड यांच्यासोबत, दुसरे लग्न केले व सहजीवन सुरू केले.

पिडीतेच्या तक्रारीनुसार, पतीने दुसऱ्या पत्नीच्या नावासह तिचे फोटो आणि स्टेटस सोशल मीडियावर अपलोड करून तिला मानसिक छळ केला. या प्रकारामुळे तिची बदनामी होऊन तिच्या दोन मुलांवरही मानसिक परिणाम झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीतेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २३ जून २०२० पासून पती व दुसऱ्या पत्नीने अश्लील व्हॉट्सॲप मेसेज पाठवून तिच्या सन्मानाचे उल्लंघन केले. तसेच, पतीचे नातेवाईक देखील या छळात सहभागी असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

विशेष म्हणजे दुसरी पत्नी, पुनम गायकवाड, सध्या जिल्हा परिषद निवडणुकीत एका राष्ट्रीय पक्षाकडून उमेदवारीसाठी प्रचार करत आहे, आणि या प्रकरणामुळे सामाजिक व राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.पोलीसांनी या प्रकरणी पिडीत पत्नीच्या तक्रारीनुसार विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे आणि सखोल चौकशी सुरु आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

6 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago