महाराष्ट्र

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी दुरुस्तीची संधी; आदिती तटकरेची घोषणा

मुंबई: ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपर्यंत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सुरू असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात 1,500 रुपये जमा केले जातात.

दरम्यान, या योजनेचा लाभ घेणाऱ्या काही महिलांसाठी ई-केवायसी (e-KYC) बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, काही महिलांनी केवायसी न केल्यामुळे, तर काहींनी केवायसीमध्ये चुका झाल्यामुळे योजनेचा हाप्ता बंद झाला होता.यावरून आनंदाची बातमी अशी आहे की, महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केले की, ज्या लाभार्थी महिलांनी ई-केवायसीमध्ये चुका केल्यामुळे हाप्ता बंद झाला आहे, त्यांना आता दुरुस्ती करण्याची संधी मिळणार आहे.

आदिती तटकरे म्हणाल्या “e-KYC प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडल्यामुळे योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी आल्या आहेत. ज्या पात्र लाभार्थ्यांनी e-KYC करूनही योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशा सर्व बहिणींना आता ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून 31 मार्च 2026 पर्यंत e-KYC दुरुस्ती करण्याची संधी देण्यात आली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा हीच महिला व बालविकास विभागाची प्रामाणिक भूमिका आहे.”लाभार्थी महिलांनी ही संधी गमावू नये आणि आपली e-KYC माहिती वेळेत दुरुस्त करावी.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

23 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

23 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

23 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

23 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

23 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

23 तास ago