क्राईम

पुण्यात भरपावसात विवाहितेवर अत्याचार, नवऱ्याने संशय घेत घराबाहेर काढल

पुणे: पवना धरणाच्या ठाकुरसाई रस्त्यावर दुचाकीवर आलेल्या अनोळखी इसमाने एका महिलेला निर्जन भागात नेऊन बळजबरीने अत्याचार केला. ही हृदयद्रावक घटना 15 जुलै रोजी दुपारी सुमारे दोनच्या सुमारास घडली.

पावसामुळे रस्ता सुनसान होता आणि नेमका याच परिस्थितीचा फायदा घेत आरोपीने अमानुष कृत्य केले. या प्रकरणात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 24 तासांत आरोपीला अटक करून तत्परतेचे उदाहरण घडवले आहे. पीडित महिला एका डोंगरी भागात राहणाऱ्या कातकरी समाजातील असून, पावसात छत्री घेऊन रस्त्याच्या कडेला एकटी जात असताना आरोपीने तिचा पाठलाग केला. पुढे गाडी आडवी लावून तिला शेताच्या बांधाजवळील झुडपात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. महिलेनं जीवाच्या आकांताने आरडाओरड केली, पण पावसामुळे कोणीही आसपास नव्हते. आरोपीने कृत्य केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला.

घाबरलेली महिला थेट आपल्या पतीकडे गेली. पण दुर्दैवाने त्याने तिच्यावरच संशय घेतला आणि घराबाहेर काढले. नाइलाजाने ती आईकडे गेली आणि घटनेची माहिती दिली. त्यानंतर तिने 16 जुलै रोजी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाला वेग देण्याचे आदेश दिले. अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश शिळीमकर आणि लोणावळा ग्रामीणचे निरीक्षक दिनेश तायडे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन तपास पथके तयार केली.

विशेष म्हणजे पीडितेच्या मदतीने संशयिताचे रेखाचित्र तयार करण्यात आले. त्या चित्राची मदत घेऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी बाळू दत्तु शिर्के, रा. जिवन नं. 01, ता. मावळ, जि. पुणे, या नराधमाला 17 जुलै रोजी अटक केली.

पोलिसांची ही जलद कारवाई म्हणजे अत्याचार पीडितांसाठी मोठा दिलासा आहे. रेखाचित्र तयार करणाऱ्या अधिकाऱ्याने पीडितेला दिलेला मानसिक आधार, तिला दिलासा देण्याचा प्रयत्न, आणि संपूर्ण टीमने दाखवलेली संवेदनशीलता हे समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला सहाय्यक निरीक्षक विजया म्हेत्रे करत असून, आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात दुष्काळ अन् पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांकडून घेतले जातात पैसे…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर पीक नुकसानीची पाहणी करण्याचे काम सुरू…

9 तास ago

शिक्रापुर पोलिसांचा बीडमध्ये छापा; साडेचार लाखांचे दागिने हस्तगत, एक आरोपी गजाआड

शिरुर (तेजस फडके) ‘तुमच्याकडील सोन्यापेक्षा हे बिस्कीट अधिक वजनाचे आहे,’ असे भासवून महिलेचा विश्वास संपादन…

22 तास ago

सहकार वाचवण्याचे मोठे आव्हान; सत्ताधारी सहकाराचे नाही तर ‘स्वाहाकाराचे’; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: देशाच्या प्रगतीमध्ये सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू…

23 तास ago

पत्रकार सन्मान योजना बंद नको; जाचक नियम हटवा, पात्र पत्रकारांना न्याय द्या!

राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…

2 दिवस ago

१८ लाख उमेदवारांच्या स्वप्नांना मिळणार आधार; ‘मिशन खाकी’चा शुभारंभ

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…

2 दिवस ago

सामान्य कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…

2 दिवस ago