क्राईम

शिक्रापूरात मोबाईल रिपेअरिंग दुकान फोडले; रिपेअरिंगसाठी आलेले मोबाईल, पॉवर बँकांसह १७,६०० रुपयांचा ऐवज लंपास

राज हॉटेलशेजारील ‘शिवराज मोबाईल रिपेअरिंग’ दुकानाचे पत्रे उचकटून चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : शिक्रापूर येथील राज हॉटेलशेजारी असलेल्या शिवराज मोबाईल रिपेअरिंग दुकानाचे पत्रे उचकटून अज्ञात चोरट्याने रिपेअरिंगसाठी आलेले मोबाईल फोन व पॉवर बँक असा एकूण १७ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दुकानमालक संतोष विश्वनाथ सानप (वय ३५, रा. शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सानप यांचे पुणे-नगर महामार्गालगत राज हॉटेलजवळ शिवराज मोबाईल रिपेअरिंग नावाचे दुकान आहे. २३ जुलै रोजी रात्री दुकान बंद करून ते घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडल्यानंतर रिपेअरिंगसाठी आलेले चार मोबाईल फोन आणि चार पॉवर बँक जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

तपासणी केली असता दुकानाचा समोरील पत्रा उचकटून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून चोरी केल्याचे स्पष्ट झाले. चोरीस गेलेल्या ऐवजात वनप्लस नॉर्ड सी-२, विवो टी-३, टेक्नो आणि सॅमसंग गॅलेक्सी कंपनीचे मोबाईल तसेच चार पॉवर बँकांचा समावेश असून, एकूण १७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार कर्पे करीत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

20 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

20 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

20 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago