महाराष्ट्र

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर सरकारचा बुलडोझर; जीआर मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; अतुल लोंढे

सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा

मुंबई: एमपीएससीमार्फत सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करणारा राज्य सरकारचा नवीन जीआर अन्यायकारक असून तो तातडीने रद्द करावा, अन्यथा राज्यातील तरुणाई पुन्हा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला.

टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना लोंढे म्हणाले की, अधिकारी पदांच्या भरतीत आतापर्यंत सुमारे ६६ टक्के जागा एमपीएससीमार्फत सरळ भरतीने आणि ३३ टक्के जागा पदोन्नतीने भरल्या जात होत्या. मात्र, नव्या जीआरनुसार उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांसारख्या पदांपैकी ६० टक्के जागा पदोन्नतीने आणि केवळ ४० टक्के जागा सरळ भरतीने भरल्या जाणार आहेत. तसेच नायब तहसीलदार पदांसाठी ८० टक्के जागा पदोन्नतीने आणि फक्त २० टक्के जागा सरळ भरतीने भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लोंढे यांनी आरोप केला की, या निर्णयामुळे अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो स्पर्धा परीक्षार्थींच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. “भाजप सरकार जेन-झी आणि तरुणाईविरोधी असून नीट पेपरफुटीप्रमाणेच आता एमपीएससीच्या विद्यार्थ्यांवरही अन्याय केला जात आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.

महसूल विभागातील १६० पदे नुकतीच पदोन्नतीने भरल्यानंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विभाग अधिक कार्यक्षम होईल, असा दावा केला होता. यावर प्रश्न उपस्थित करत लोंढे म्हणाले, “मग सरळ भरतीतून येणारे अधिकारी कार्यक्षम नसतात का?”

पुण्यासह राज्यभरातील लाखो विद्यार्थी एमपीएससीची तयारी करत असून या निर्णयामुळे सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न धोक्यात आले आहे. सरकारने हा जीआर तातडीने मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही अतुल लोंढे यांनी दिला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

19 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

19 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

19 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago