शिरूर तालुका

शेजाऱ्यानेच रचला घरफोडीचा डाव पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत केला पर्दाफाश

शिक्रापूर (ओमकार भोरडे ): शेजारधर्माच्या नात्यालाच काळिमा फासणारी धक्कादायक घटना शिरूर तालुक्यात उघडकीस आली आहे. दशक्रिया विधीसाठी संपूर्ण कुटुंब घराबाहेर जाणार असल्याची माहिती घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच सराईत चोराला पुरविल्याने बंद घरावर डल्ला मारून तब्बल २ लाख ६५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले मात्र शिक्रापूर पोलिसांनी तांत्रिक तपास सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या काही दिवसांत गुन्ह्याचा छडा लावत चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे.

ढेरंगेवस्ती ता. शिरूर येथील किरण पंडित ढेरंगे हे आपल्या कुटुंबासह दशक्रिया विधीसाठी बाहेरगावी गेले होते. घर बंद असल्याची अचूक माहिती मिळाल्यानंतर आरोपींनी नियोजनबद्ध पद्धतीने घराचे कुलूप तोडले. त्यानंतर घरातील कपाटातून गंठण चैन कानातील वेल डोरले यांसह सुमारे २ लाख ६५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण तसेच गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान धनंजय उर्फ धनाजी दत्तात्रय घोडके रा. कात्रज पुणे याचा सहभाग निष्पन्न झाला आहे.

त्याला अटक केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून चोरीस गेलेले सर्व सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.

या प्रकरणातील तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली असून घराशेजारी राहणारा दिपक बाळासाहेब ढेरंगे रा. ढेरंगेवस्ती कोरेगाव भीमा यानेच घरातील हालचालींची माहिती आरोपीला पुरवून चोरी घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून न्यायालयाने मुख्य आरोपीस चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, महेश डोंगरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, तसेच गुन्हे शोध पथकातील लहानू बांगर, श्रावण गुपचे, नवनाथ नाईकडे, रोहीदास पारखे, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, अमोल नलगे, नारायण वाळके, राम जाधव, मच्छिंद्र निचीत यांनी सहभाग घेत ही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago