DEATH
शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील पेशवाई हॉटेलच्या शेजारी एका बेवारस व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सणसवाडी (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गालगत हॉटेल पेशवाईच्या शेजारी एक व्यक्ती मृतावस्थेत पडल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस हवालदार आजिनाथ शिंदे यांनी सदर ठिकाणी जात पंचनामा केला असता तेथे अंदाजे अंदाजे ४० ते ४५ वर्षे, रंग काळा, टक्कल केलेला, काळे पांढरे केस, अंगात निळ्या रंगाचा बनियन, खाकी रंगाची प्यांट, कमरेला पट्टा असल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांनी आजूबाजूला सदर इसामाबाबत चौकशी केली असता काहीही माहिती मिळू शकली नाही.
याबाबत सणसवाडीचे पोलीस पाटील दत्तात्रय ज्ञानेश्वर माने (वय ४०) रा. सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून सदर इसमाबाबत कोणासही काही माहिती असल्यास शिक्रापूर पोलिसांशी ०२१३७२८६३३३ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन शिक्रापूर पोलिसांनी केले आहे.
नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशाला संबोधित केले.…
पुणे: पुणे जिल्ह्यातील चाकण आणि लगतच्या परिसरातील वाढते औद्योगिकीकरण तसेच पायाभूत सुविधांवरील वाढता ताण लक्षात…
सांगली : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने ‘हिंदवी स्वातंत्र्य दिन’ पदयात्रेचे…
परळी : परळी येथे पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाच्या कोनशिला समारंभ आणि भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात…
आयुर्वेदानुसार विसर्ग काळात म्हणजे सुर्याचे दक्षिणायन सुरु झाल्यावर म्हणजेच पावसाळ्यात शरीरात वात दोष शरीरात बळावतो…
अनेकदा किचनमध्ये काम करत असताना, स्वयंपाक करत असताना गरम भांड्यांना हात लावल्यावर किंवा चपात्या भाजताना…