शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्यावर भारत गॅस फाटा परिसरात पहाटेच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने संशयितपणे फिरणाऱ्या दोघा युवकांना शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद करत चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या अमीन लाल खान व विजय संजय निकत या दोघांवर गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, पोलीस नाईक अमोल दांडगे, जयदीप देवकर व लखन शिरसकर हे रात्रगस्त घालत असताना त्यांना चाकण रोड येथील करंदी फाटा येथे दोन संशयित युवक अंधाराचा फायदा घेऊन लपल्याचे दिसून आले. मात्र पोलीस आल्याचे लक्षात येता ते पळून लावू लागले.
दरम्यान पोलिसांनी त्याला पकडत त्यांच्याकडे चौकशी केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले तर त्यांच्याकडे वाकड पोलीस स्टेशन हद्दीतून चोरीला गेलेली एक दुचाकी देखील मिळून आल्याने दोघे चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
याबाबत पोलीस शिपाई लखन जनार्दन शिरसकर रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अमीन लाला खान (वय २५) रा. कारेगाव (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. भागड ता. जयपूर जि. सैडोहाल मध्यप्रदेश व विजय संजय निकत (वय २१) रा. कारेगाव (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. चोरवड ता. भुसावळ जि. जळगाव या दोघांवर गुन्हे दाखल करत त्यांना त्याला अटक असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विकास पाटील हे करत आहे.
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…