क्राईम

सणसवाडीत ट्राफिक वार्डनला शिवीगाळ, दमदाटी करत दोघांकडून मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावर असलेल्या एल अँड टी फाटा येथे ट्राफिक वार्डनने गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याने ट्राफिक वार्डनला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दिनेश कंगले व विशाल दरेकर या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशनला ट्राफिक वार्डन म्हणून कार्यरत असलेला राहुल वायकर हा सणसवाडी येथील पुणे नगर महामार्गावर असलेल्या एल अँड टी फाटा येथे वाहतूक नियमनाचे काम करत असताना एक कार मधून दोघेजण आले त्यांनी रस्त्याच्या कडेला कार उभी केली. यावेळी राहुल वायकर याने त्यांना गाडी बाजूला घेण्यास सांगितली असता दोघांनी वार्डन वायकर यास शिवीगाळ, दमदाटी करत लाकडी दांडक्याने मारहाण केली.

याबाबत ट्राफिक वार्डन राहुल कल्याण वायकर (वय ३३) रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी दिनेश कंगले व विशाल दरेकर दोघे रा. सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश करपे हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यात गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…

9 तास ago

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

1 दिवस ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

2 दिवस ago

‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…

2 दिवस ago

फडणवीसांना राहुल गांधींवर टीका करण्याचा आजारच जडला! हर्षवर्धन सपकाळ

निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…

2 दिवस ago

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

2 दिवस ago