पुणे (प्रतिनिधी): एका खाजगी सावकाराने उसने दिलेले पैसे परत न दिल्याने पिडीत महिलेच्या पतीला चाकूचा धाक दाखवून त्याच्या समोरच त्याच्या पत्नीवर बलात्कार केला. तसेच पुन्हा शरिसुखाची मागणी करत व्हिडिओ व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील हडपसर परिसरात घडली आहे. याप्रकरणी बोपखेल येथील ३४ वर्षीय महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली असल्याने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पुन्हा शरीर सुखाची मागणी करणाऱ्या त्या नराधम खासगी सावकारास पोलिसांनी बेड्या ठोकल्या असुन इम्तियाज हशीम शेख (वय ४७, म्हाडा कॉलनी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला जात असुन त्या नराधमाची गुरुवारी भरपावसात हडपसर परिसरात पोलिसांनी धिंड काढली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी इम्तियाज शेख हा मसाले विक्रेता असुन आरोपीने फिर्यादी पीडित महिलेच्या पतीस ४० हजार रुपये उसने दिले होते. ते पैसे ते परत करू शकले नाही. त्यामुळे उसने पैसे परत न दिल्याने फेब्रुवारी २०२३ मध्ये इम्तियाज याने पीडितेच्या पतीला जिवे मारण्याची धमकी दिली होती. नंतर त्याने दोघांना तो राहत असलेल्या सुरक्षानगर येथे बोलावून घेतले. तेथे त्याने पतीला समोर बसवून चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्याच्यासमोरच फिर्यादीवर महिलेवर बलात्कार केला होता. त्यानंतर आरोपीने याच कारणातून तिच्याकडे पुन्हा शरीरसुखाची मागणी केली; परंतु तिने नकार दिला असता त्याने त्याच्या घरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून झालेले चित्रीकरण पतीला पाठवून तो व्हिडीओ सामाजिक माध्यमावर प्रसारित केला.
त्यानंतर सदर आरोपीने या घटनेचा एमएमएस तयार केला. तसेच त्यानंतर वारंवार पिडीत महिलेकडे यौन संबंधाची मागणी केली. त्याला पीडितेने विरोध केला. त्यामुळे इम्तियाज हसीन शेख याने ती क्लिप सोशल मीडियावर टाकली. यामुळे ती महिला प्रचंड हादरली. तिला मोठा मानसिक धक्का बसला. शेवटी तिने हिंमत करुन हडपसर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ आरोपी इम्तियाज हसीन शेखच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके पुढील तपास करीत आहेत.
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…