क्राईम

अन्न प्रशासन विभाग कोमात, ग्रामीण भागात पानाची विक्री जोमात…

सणसवाडी, कोरेगाव भीमा, शिक्रापूर येथील एकूण आठ पान शॉपवर कारवाई 

कोरेगाव भिमा (प्रतिनिधी): ग्रामीण भागातील तरुणाईला पानांचे अक्षरशः व्यसन लागले असून एक तरुण साधारणतः दिवसाला आठ ते दहा पाने खात असून पानाला चुना लावायला व पान कातरायला माणसे कामाला ठेवावी लागत असून यामध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस स्टेशन हद्दीत सणसवाडी , कोरेगाव भीमा, शिक्रापूर येथील एकूण आठ पान शॉप वर कार्यवाही करण्यात आली आहे. त्यामुळे पान मसाला विकणाऱ्या पान शॉप वर कडक कार्यवाहीने पान शॉप चालकांचे दणाणले धाबे दणाणले आहेत.

या पान मसाल्यामुळे तरुणांच्या शरीरावर व मानसिक आरोग्यावर परिणाम होत असून यामुळे शाळकरी व विद्यालयीन,महाविद्यालयीन तरुणही पानांचे शौकीन झाल्याचे दिसत असून शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आलेल्या कार्यवाहीने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

सणसवाडी येथील १) श्री सिद्धेश्वर पान शॉप २) सिद्धेश्वर 27 पान शॉप ३) जय मल्हार पान शॉप, कोरेगाव भीमातील १) जय मल्हार पान शॉप २) एस के पान शॉप, शिक्रापूर गावामध्ये १) जय मल्हार पान शॉप २) मोरया पान शॉप ३) जयवर्धन पान शॉप हे शैक्षणिक क्षेत्राच्या परिसरामध्ये तसेच त्याच्या जवळपास, प्रतिबंधित पान मसाला ज्यावर कोणत्याही प्रकारचं नाव नाही किंवा तो धोकादायक आहे अशा प्रकारचा लेबल नसलेला पान मसाला त्या गावांमधील पान टपरी धारक पानांमध्ये मिसळून तो लोकांना विक्री करत असताना आढळून आले आहेत. तसेच त्याची सवय विशेष करुन शिक्षण घेत असलेल्या मुलांना तसेच नवयुवकांना जास्त प्रमाणात असल्याचे आढळून आल्यामुळे त्यांच्यावर सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली असून सदर मुद्देमाल जप्त करून त्याचे सॅम्पल फूड अँड ड्रग्स विभागाकडे पाठवण्यात येणार आहेत.

तसेच त्यामध्ये प्रतिबंधित पान मसाला किंवा गुंगीकारक पदार्थ आढळून आल्यास त्यांच्यावर त्याप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे. पालकांना व नागरिकांना शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की आपल्या नवयुवकांना अशा कोणत्याही व्यसनाची बाधा होऊ नये याकडे त्यांनी लक्ष द्यावे आणि असा प्रकार आढळून आल्यास शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा असे शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी केले आहे.

अन्न प्रशासन विभाग कोमात , ग्रामीण भागात पानाची विक्री जोमात…

शिक्रापूर, कोरेगाव भीमा, सणसवाडी येथील हजारो युवकांना पानाचे व्यसन लागत असून शैक्षणिक क्षेत्राच्या परिसरामध्ये तसेच त्याच्या जवळपास, प्रतिबंधित पान मसाला ज्यावर कोणत्याही प्रकारचं नाव नाही किंवा तो धोकादायक आहे अशा प्रकारचा लेबल नसलेला पान मसाला त्या गावांमधील पान टपरी धारक पानांमध्ये मिसळून तो लोकांना विक्री करत असताना अन्न प्रशासन विभाग मात्र डोळे बंद करून बसले आहे. यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाची ‘अर्थपूर्ण ‘ मुक संमती आहे काय? ज्यामुळे या पान शॉप वर त्यांच्याकडून अन्न व भेसळ कायद्यातील तरतुदीनुसार कार्यवाही का होत नाही ? असा प्रश्न उपस्थित होत असून अन्न प्रशासन विभागाच्या गलथान कारभार याला कारणीभूत ठरत असून अन्न प्रशासन विभाग कोमात आणि ग्रामीण भागात पानाची विक्री जोमात अशीच अवस्था झाल्याचे दिसत आहे.

तरुणाई पान मसाला खाण्यात अग्रेसर…

ग्रामीण भागातील विद्यार्थी व तरुणाईला या पान शॉप मधील पानांचे व्यसन लागू नये यासाठी पालकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी काळजी घेणे गरजेचे असून प्रतिबंधित पान मसाला किंवा गुंगीकारक पदार्थ आढळून आल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी शिक्रापूर पोलीस स्टेशन व पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधत आपल्या परिसरातील तरुणांना व्यवसनाधिन होण्यापासून वाचवण्यासाठी प्रयत्न करायला हवे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…

1 तास ago

एक्सरसाईज नंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत कोणती

एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…

1 तास ago

सरकारच्या हिस्सा विक्रीच्या निर्णयाने LIC शेअर घसरला; बाजार उघडताच 9% पडझड

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…

1 तास ago

यशवंतरावांच्या जिल्ह्यात ठरावांचा लिलाव दुर्दैवी! ठरावांचा बाजार म्हणजे लोकशाहीचा पराभव

सातारा : राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा सहकार चळवळीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती…

2 तास ago

नाना पाटेकर-सतीश पुळेकरांच्या मैत्रीत दुरावा; ‘इतकी चांगली मैत्री संपली’, पुळेकरांची खंत

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेते सतीश पुळेकर यांची एकेकाळची गाजलेली मैत्री…

2 तास ago

रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव कसे जोडाल? जाणून घ्या ऑनलाइन आणि ऑफलाइन संपूर्ण प्रक्रिया

मुंबई: कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन झाले आहे आणि त्याचे नाव शिधापत्रिकेत (रेशन कार्ड) समाविष्ट करायचे…

2 तास ago