क्राईम

पुणे-अहमदनगर महामार्गावर विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू…

पुणे : पुणे-अहमदनगर महामार्गावर झालेल्या विचित्र अपघातात दोघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. कोरेगाव भीमा येथील वाडा पुनर्वसन येथे स्विफ्ट कार आणि दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. त्यानंतर अपघाताची माहिती मिळताच जखमींच्या मदतीसाठी निघालेल्या रुग्णवाहिकेला अपघात झाला. यामध्ये आणखी एका युवकाचा मृत्यू झाला आहे.

स्विफ्ट कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात महेश गव्हाणे या युवकाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका अपघातस्थळाकडे निघाली. सणसवाडी गावच्या हद्दीत कल्पेश वनज फाट्याजवळ रुग्णवाहिकेचे चालक वैभव डोईफोडे यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे रुग्णवाहिकेची धडक दुचाकीला बसली. यामध्ये श्रीकांत सुर्यकांत उबाळे यांचा मृत्यू झाला. तर रुग्णवाहिका चालकासह त्याच्या शेजारी बसलेले अक्षय रविंद्र बनसोडे हे जखमी झाले आहेत.

महामार्गावर झालेल्या दुहेरी अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, पुणे-नगर महामार्गावर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

12 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago