क्राईम

शिक्रापूर हद्दीत वेगवेगळ्या अपघातांत पाच जणांचा मृत्यू

अपघातग्रस्ताच्या मदतीस आलेल्या रुग्णवाहिकेच्या धडकेत एकाचा मृत्यू

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वारंवार अपघातांमध्ये नागरिकांचा मृत्यू होत असताना शिक्रापूर, कोरेगाव भीमा, जातेगाव फाटा येथे झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये महेश राजाराम गव्हाणे, श्रीकांत सुर्यकांत उबाळे, उद्धव सखाराम सातपुते, बाबूशोना आबेदअली शेख व अजयभान चंद्रकांतभाई भावसार या 5 जणांचा मृत्यू झाला असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे वेगवेगळ्या वाहन चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये २५ जानेवारो रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास महेश गव्हाणे हा त्यांच्या ताब्यातील एम एच १२ व्ही डी १३९३ या दुचाकी हून चाललेला असताना पाठीमागून अहमदनगर बाजूने आलेल्या एम एच १२ एस वाय १९९० या कारची महेशला धडक बसून महेश राजाराम गव्हाणे (वय २५) रा. फडतरे वस्ती कोरेगाव भीमा (ता. शिरुर) जि. पुणे याचा मृत्यू झाला.

दरम्यान महेश याला घेण्यासाठी आलेल्या एम एच रुग्णवाहिकेची एम एच १२ डी डब्ल्यू ६०७३ या दुचाकीला धडक बसून दुचाकी चालक श्रीकांत सुर्यकांत उबाळे (वय २६) रा. ढेरंगेवस्ती कोरेगाव भीमा (ता. शिरुर) जि. पुणे याचा मृत्यू झाला तर रुग्णवाहिका चालक वैभव गजानन डोईफोडे व अक्षय रवींद्र बनसोडे दोघे रा. बजरंगवाडी शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे हे जखमी झाले.

या दोन अपघातांनंतर २६ जानेवारी रोजी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास उद्धव सातपुते हे शिक्रापूर पाबळ चौकातून रस्ता ओलांडत असताना पुणे बाजूने आलेल्या अज्ञात वाहनाची सातपुते यांना धडक बसून झालेल्या अपघातात उद्धव सखाराम सातपुते (वय ३५) सध्या रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. इसाद ता. गंगाखेड जि. परभणी यांचा मृत्यू झाला.

त्यानंतर सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास चाकण रोड पंजाबी ढाबा समोर बाबूशोना शेख हे रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात बाबूशोना आबेदअली शेख (वय २७) रा. करंदी फाटा (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. सीजग्राम ता. भरतपूर जि. मुर्शिदाबाद कलकत्ता याचा मृत्यू झाला असून त्यानंतर रात्री बारा वाजण्याच्या सुमारास अजयभान भावसार हा शिक्रापूर चाकण रस्त्याचे नजीक हॉटेल चंद्रमा समोरून रस्ता ओलांडत असताना एम एच १४ के जे ६२१९ या कारची भावसार यांना धडक बसून झालेल्या अपघातात अजयभान चंद्रकांतभाई भावसार (वय ३८) रा. सोनगढ ता. सोनगढ जि. तापी राज्य गुजरात याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

याबाबत शिक्रापूर पोलिसांनी शंकरसन श्रीनरहरी राऊत रा. लोहगाव जि. पुणे, रुग्णवाहिका चालक वैभव गजानन डोईफोडे रा. बजरंगवाडी (ता. शिरुर) जि. पुणे, आदित्य बापू हांडे रा. चिंचोशी ता. खेड जि. पुणे यांच्यासह 2 अज्ञात वाहन चालकांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago