सातारा: ऐतिहासिक शाहूनगरीसह संपूर्ण सातारा जिल्ह्यात गांजा, बंटा, एमडी गोळ्या तसेच इतर अंमली पदार्थ आणि गुटखा विक्री राजरोसपणे सुरू असल्याचा आरोप करत संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी रक्षक प्रतिष्ठानने केली आहे. यासंदर्भात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना निवेदन सादर केले. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
रक्षक प्रतिष्ठानने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरी तसेच ग्रामीण भागात अल्पवयीन मुले गांजा व इतर अंमली पदार्थांचे सेवन करताना आढळत असून त्यामुळे गुन्हेगारी घटनांत वाढ होत असल्याची गंभीर चिंता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील विविध भागांत खुलेआम गुटखा विक्री सुरू असल्याचा दावा करण्यात आला असून यासंदर्भातील काही व्हिडिओ पुरावे कार्यकर्त्यांकडे उपलब्ध असल्याचे संस्थापक अध्यक्ष सुशील मोझर यांनी सांगितले.
देशाची भावी पिढी असलेल्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये गांजा, बंटा, एमडी गोळ्या आणि इतर नशेच्या पदार्थांचे आकर्षण वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. बंदी असलेले पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याने युवकांसह अल्पवयीन मुले नशेच्या विळख्यात अडकत असल्याबद्दल संस्थेने तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
बाजारपेठांमध्ये सर्रास अंमली पदार्थांची विक्री होत असताना पोलिसांकडून ठोस कारवाई का होत नाही, असा सवालही रक्षक प्रतिष्ठानने उपस्थित केला आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना माहिती मिळत असेल तर संबंधित यंत्रणांना ती का मिळत नाही, असा प्रश्न विचारत जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पूर्वीच्या काळी लोक अशी कामं करत असत ज्यात शरीराला जास्त मेहनत करावी लागत असे. पण…
घसा खराब होणे, सोलवटल्यासारखे वाटणे आणि खाताना त्रास होणे हे अनेकदा बदलत्या हवामानामुळे, गरम-थंड पदार्थ…
आहार: सकाळचा नाश्ता: फळे, भाज्या, कडधान्ये आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करा. मीठाचे…
मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) धडाकेबाज कारवाईमुळे राज्यातील भेसळखोर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या…
पुणे : गणेशोत्सवातील डीजे आणि वाढत्या ध्वनिप्रदूषणाविरोधात भूमिका मांडणारे सामाजिक कार्यकर्ते विद्याधर बापट यांना टीव्ही9…
पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या चर्चेदरम्यान सत्ताधारी भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि माजी उपमहापौर शैलजा मोरे यांच्या…